शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
3
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
4
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
5
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
6
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
7
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
8
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
9
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
10
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
11
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
12
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
13
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
14
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
15
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
16
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
17
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

खाजगी डॉक्टरचा ५० लाखांचा विमा प्रस्ताव नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:27 AM

रुग्णांवर उपचार करताना झाला मृत्यू; पालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा न दिल्याची सबब केली पुढे

कल्याण : कोरोनाकाळात आरोग्य सेवा देताना खाजगी व्यावसायिक डॉ. पंकजकुमार चौधरी यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची विमा रक्कम मिळावी, असा प्रस्ताव केडीएमसीने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे पाठविला होता. मात्र, चौधरी यांनी मनपाने तयार केलेल्या कोविड रुग्णालयात सेवा दिली नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्यांचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना ५० लाखांचे विमाकवच दिले जाईल. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावल्यास डॉक्टरांच्या वारसांना पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये विम्याचा दावा करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दुसरीकडे सुरुवातीला कोरोनाचा कहर वाढत असताना खाजगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देणे थांबविले होते. तर, काहींनी त्यांचे दवाखाने बंद केले होते. त्या वेळी खाजगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा द्यावी, असे आदेश केडीएमसी आयुक्तांनी काढले होते. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले. त्याच काळात डॉ. चौधरी हे खाजगी रुग्णालयात सेवा देत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे विम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मात्र, त्यांनी मनपाने उभारलेल्या कोविड रुग्णालयात सेवा न दिल्याने त्यांचा विम्याचा दावा सरकारने रद्द केला आहे.चौधरी यांनी कोविडकाळात सेवा दिली होती की नाही, याची शहानिशा स्थानिक आरोग्य विभागाने पुन्हा करून त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे फेरविचारासाठी पाठवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.खासदारांनी केली होती मागणीसरकारी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सप्रमाणे खाजगी डॉक्टरांनाही५० लाखांचे विमाकवच द्यावे, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे आणि संसदेत केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या