सदानंद नाईकउल्हासनगर : शहरात कोविड -१९ चे लसीकरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून खाजगी रुग्णालय पालिकेच्या मदतीला धावणार आहे. उपायुक्त मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी मंगळवारी संच्युरी, क्रिटिकेअर, सर्वांनंदन हॉस्पिटलची पाहणी केली आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोविड-१९ च्या लसीकरणाच्या पाश्वभूमीवर गेल्या आठवड्यात आरोग्य केंद्रात ड्राय रन घेतला होता. यावेळी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांना लसीकरण बाबत माहिती देऊन त्यांची नोंदणी केल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी स्वतः ड्राय रनचा आढावा घेतला होता. १६ जानेवारी पासून प्रत्यक्षात लसीकरण मोहिमेला सुरवात होणार असून महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली. लसीकरणा साठी महापालिका आरोग्य केंद्रासह शासकीय रूग्णालय व खाजगी रुग्णालय आदींची गरज भासणार आहे. यातूनच संच्युरी, सर्वानंद, क्रिटिकेअर रुग्णालय व त्यातील काही खोल्यांची पाहणी करण्यात आली.
कोविड-१९ च्या लसीकरणाची सुरवात १६ जानेवारीला होण्याची शक्यता उपायुक्त मदन सोंडे यांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यासह अन्य अश्या ४५०० पेक्षा जास्त जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य विभागाच्या कामकाजाचे महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी कौतुक केले. लसीकरणाला सुरवात होत असलेतरी नागरिकांनी मास्क, सैनिटाईज व सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले. तर टप्प्या टप्प्याने सर्वांनाच कोविड-१९ ची लस मिळणार असल्याची शक्यता महापौर लिलाबाई अशांन यांनी व्यक्त केली.