ठाणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या मध्यवर्गीय रु ग्णांना माफक दरात उपचार मिळण्यासाठी महापालिकेने ठरविलेले दर ठाण्यातील खाजगी रु ग्णालयांनी फेटाळले आहेत. कोरोनाच्या रु ग्णाला दररोज किमान १२ हजार ५०० चा भूर्दंड बसत आहे. ९ ते १० पेशंट असलेल्या कक्षातील एका बेडचा ४ हजार ५०० रु पये चार्ज, ३६५० रु पयांचे पीपीई कीट व मास्क, २५०० डॉक्टर फी यांच्यासह औषधे व चाचण्यांसाठी दररोज १२ हजार ५०० रु पये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला असून, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रु ग्णालयांची चौकशी करु न कारवाईची मागणी केली आहे. अमरावतीहून ठाण्यातील निवासस्थानी परतलेल्या एका ७१ वर्षांच्या वृद्धाची सतर्कता म्हणून नौपाडा येथील खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांना घाईघाईत घोडबंदर रोडवरील एका खाजगी रु ग्णालयात नेण्यात आले. ते मध्यमवर्गीय असल्यामुळे कुटुंबियांनी सामान्य कक्षाची मागणी केली होती. मात्र, कोरोनासाठी केवळ आयसीयू व एचडीयू युनिट आहेत. सामान्य कक्ष अस्तित्वात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना एचडीयू (हाय डिफेडन्सी यूनिट) कक्षात दाखल करण्यात आले. तेथील रु ममध्ये ९ ते १० रु ग्णांना ठेवण्यात आले असल्याचे रु ग्णाचे म्हणणे आहे. तेथे त्यांच्यावर ८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. डिस्चार्जआधी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणीचा आग्रह धरला. मात्र, त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत तब्बल एक लाख एक हजार १३९ रु पयांचे बिल हाती सोपविण्यात आले. या बिलाने रु ग्णासह कुटुंबियांनाही धक्का बसला. स्पेशल वॉर्ड वा आयसीयूमध्ये दाखल नसतानाही, दररोज साडेबारा हजार रु पयांप्रमाणे बिल कसे आले, असा या रु ग्णाचा सवाल आहे. आपली कैफियत त्यांनी नगरसेवक नारायण पवार यांना सांगितली.त्यानुसार पवार यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना पत्रव्यवहार केला असून कारवाईची मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी अधिकचे पैसे घेणाऱ्या हॉस्पीटलसाठी नियमावली तयार केली आहे. परंतु त्याला पुर्ता हरताळ फासला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घोडबंदर येथील संबंधित रु ग्णालयावर कारवाई करावी. तसेच सर्व खाजगी रु ग्णालयांमधील कारभाराची चौकशी करु न ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.एकाच पीपीई किटवर रु ग्ण तपासणीपीपीई कीटसाठी दररोज ३ हजार ६७५ रु पये आकारले गेले. मात्र, माझ्या परिचित रु ग्णाच्या मते कक्षातील ९ ते १० जणांची डॉक्टरांकडून एकाच फेरीत तपासणी होत होती. अशा परिस्थितीत प्रत्येक रु ग्णाकडून पीपीई कीटसाठी शुल्क कसे आकारले जाते, असा सवाल पवार यांनी केला. महापालिकेने सामान्य कक्षासाठी चार हजार रु पये दर निश्चित केल्याचीही संबंधित रु ग्णालयाला माहितीच नाही. तेथे केवळ आयसीयू व एचडीयू असे दोन कक्ष आहेत. महापालिकेचा कोणताही आदेश रु ग्णालयाकडे आला नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
ठाण्यातील खाजगी रुग्णालये महागडीच, कोरोना रुग्णासाठी रोजचा १२ हजार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 4:00 PM