लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिर्डी येथून बोरीवलीकडे निघालेल्या एका खासगी प्रवासी बसला मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत २१ प्रवासी सुखरुप बचावल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.साईराज ट्रॅव्हल्सची ही बस ठाण्यातील फ्लॉवर व्हॅलीसमोरील मुंबई - नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरुन बोरीवलीकडे जात होती. बस ज्युपीटर रुग्णालयासमोरील सेवा रस्त्याकडे वळाली, त्यावेळी ती गरम झाल्यामुळे चालक नदीम पटेल यांनी सर्व २१ प्रवाशांना बस बाहेर उतरविले. प्रवाशी उतरल्यानंतर अवघ्या काही वेळातच बसने पूर्णपणे पेट घेतला. बसला मोठया प्रमाणात अचानक आग लागल्यामुळे प्रवासी तसेच इतर वाहन चालकांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले होते. काही स्थानिकांनी जमेल तसे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे आलेल्या ठाणे महापालिकेच्या दोन फायर इंजिन आणि एका रेस्क्यू व्हॅनच्या मदतीने अर्ध्या तासामध्ये आगीवर नियंत्रण आणल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी सांगितले. घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणले. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी बसचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
ठाण्यात खासगी प्रवासी बसला अचानक आग: २१ प्रवासी सुखरुप बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 11:25 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिर्डी येथून बोरीवलीकडे निघालेल्या एका खासगी प्रवासी बसला मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अचानक ...
ठळक मुद्देस्थानिक नागरिकांनीही आग विझविण्यासाठी केली मदतबसचे मोठया प्रमाणात नुकसान