शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

‘त्या’ खाजगी सुरक्षा रक्षकांना परिवहन विभागाने दिला नारळ; तिकिट तपासणीसाची सेवा बजावित होते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 6:29 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी सेवेतून कमी केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. 

- राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी सेवेतून कमी केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. 

पालिकेने मुख्यालयात नियुक्त केलेल्या सुमारे २० ते २५ खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ सुरक्षा रक्षकांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन  विभागात तिकिट तपासणीसाचा अतिरीक्त कार्यभार सोपविला होता. त्यामुळे मुख्यालयातील सुरक्षा रक्षकाचे अर्धवेळ काम आटोपून दुपारी ३ वाजताच्या सुमारास परिवहन सेवेत तिकिट तपासणीसाचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. यात त्यांना तिकिट तपासणीसाचे कोणतेही ज्ञान तसेच त्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही ते काम दिल्याने नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना त्याचे प्रशिक्षण दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले तर दिलेले प्रशिक्षण अपुरे असल्याचे त्या कर्मचा-यांकडुन सांगण्यात आले. यामागे प्रशासनाकडून नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी परिवहन सेवा चालविण्यासाठी पालिकेला सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करणा-या सैनिक सिक्युरीटी या  कंपनीला कंत्राट देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु झाला होता. त्याची निविदाही कंपनीने भरली होती. मात्र एकच निविदा प्राप्त झाल्याने पालिकेने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कंत्राट त्याच कंपनीला देण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नातूनच त्या सुरक्षा रक्षकांना सुरुवातीला तिकिट तपासणीसाच्या कामाला जुंपण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली होती. कालांतराने त्यांची पुर्ण वेळेकरीता परिवहन विभागात कंत्राटावरच नियुक्ती करण्यात आली. पालिकेकडून परिवहन सेवेसाठी एकुण १००व पैकी ५२ बसच खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यातील १० नवीन बस प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदणी अभावी धूळ खात उभ्या आहेत. तर उर्वरीत ४२ पैकी ३५ ते ३६ बस प्रवासी सेवेसाठी दररोज उपलब्ध होतात.  यामुळे परिवहन सेवा अपुरी ठरत असल्याची ओरड स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे. त्यातच हि सेवा चालविण्यासाठी सुमारे ३५० कर्मचारी विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असताना पुढे बसची संख्या वाढणार असल्याने त्या १२ सुरक्षा रक्षकांची सेवा आवश्यक ठरणार असल्याचे गृहित धरुन गेल्या आठवड्यात पुन्हा त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र अचानक परिवहन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या १२ सुरक्षा रक्षकांना विभागात अतिरीक्त कर्मचारी ठरल्याच्या कारणावरुन कमी करण्यात येत असल्याचे कळविले. त्यामुळे परिवहन सेवेतून नारळ मिळाल्यानंतर त्या कर्मचाय््राांनी पुन्हा सुरक्षा रक्षकाच्या सेवेतील नियुक्तीसाठी प्रयत्न सुरु केला. मात्र त्यांना तेथेही लाल दिवा दाखविण्यात आल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत परिवहन विभागाचे आगार व्यवस्थापक सुरेश कलंत्रे यांना संपर्क साधला असता त्यांनी त्याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक