शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

पोषण आहारची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची अंगणवाडी सेविकांवर आफत; राज्यभर संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:28 PM

Anganwadi workers : केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांर्तगत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवठा केला जात आहे.

ठाणे : गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके आदींना पोषण आहार देण्यात येत आहे. या आहारच्या लाभार्थ्यांसह संबंधित माहिती ऑनलाईन इंग्रजी भाषेत नोंदण्याची आफत अंगणवाडी सेविकांवर आली आहे. इंग्रजी भाषेच्या या माहितीसाठी या अल्प शिक्षित ताईंना आता सक्ती केल्या जात असल्यामुळे त्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (problems to Anganwadi workers for filling up nutrition information in English; Statewide outrage)

केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांर्तगत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवठा केला जात आहे. या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी व सेवांचे सनियंत्रण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करुन केंद्र शासनाने माहिती संप्रेक्षण व तंत्रज्ञान आधारित पोषण ट्रॅकर या अँप्लीकेशननी निर्मिती केली आहे. 

पोषण ट्रॅकर या अँप्लीकेशनमध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वरयोगटातील बालके यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्यााची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पण आदिवासी, ग्रामीण व शहरी प्रकल्पात काम करणाऱ्या बहुसंख्य अंगणवाडी सेविकांचे शिक्षण मराठी भाषेत झाले, याशिवाय काही सेविका अल्पशिक्षित आहेत. त्यांना लाभार्थ्यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची समस्या येत आहे. 

महाराष्ट्र राज्यात शासनाची सर्व कामे मातृभाषेत केली जात आहेत. शासनाचे असे धोरण आहे की, राज्यात सर्व कामे मातृभाषेत केली पाहिजेत. मात्र अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अँप्लीकेशनमध्ये पोषण आहारची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याचे संबंधित आयुक्तालयाने आदेश जारी करुन सैनिकांना सक्ती केली आहे. 

आयुक्तालयाचे हे आदेश शासनाच्या धोरणाविरुध्द राज्यातील अंगणवाडी सेवकांनी  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघा च्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासनाकडे दाद मागितली आहे. इंग्रजी भाषेत माहिती भरण्याची अट तत्काळ शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. 

पोषण अभियानांतर्गत केंद्र शासनामार्फत विकसीत करण्यात आलेले पोषण ट्रॅकर अँप्लीकेशनमध्ये अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्याची माहिती इंग्रजीमध्ये भरण्याची करण्यात येत असलेली सक्ती बंद करून, मातृभाषेत भरण्याचे आदेश त्वरीत देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा