शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
4
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
5
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
6
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
7
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
8
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
9
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
10
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
11
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
12
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
13
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
14
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
15
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
16
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
17
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
18
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
19
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
20
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

डोंबिवलीत जल्लोषात मिरवणूक

By admin | Published: March 16, 2017 2:47 AM

शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे तिथीनुसार बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत विविध सामाजिक

डोंबिवली : शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे तिथीनुसार बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ सहभागी झाले होते. ढोलताशावादनाची राज्यस्तरीय स्पर्धाही आकर्षण ठरली. मानपाडा रस्त्यावर शिवसेना शाखेसमोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रख्यात कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी साकारलेला देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दुपारी ३.३० वाजता मानवंदना देऊन राज्यस्तरीय स्पर्धेचा शुभारंभ शिवनाद ढोलताशा पथकाने केला. त्यानंतर, मान्यवरांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर, दुपारी ४ वाजता मिरवणूक सुरू झाली. शिवसेनेच्या शहरातील विविध शाखांनी काढलेल्या मिरवणुका चाररस्ता, टिळक पथ, फडके रोड येथे एकत्र आल्या. राज्यस्तरीय ढोलाताशावादन स्पर्धेत डोंबिवली, मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, देवगड येथील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा रात्री १० पर्यंत चालल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. दरम्यान, महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे तसेच सर्व पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती होती. (प्रतिनिधी)टिटवाळ्यात बाइकफेरीटिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. या वेळी शिव प्रतिमांचे पूजन करून जयघोष करण्यात आला. टिटवाळा शहरासह गावागावांमध्ये बाइकफेऱ्या काढण्यात आल्या. प्रभाग क्र मांक ११ च्या नगरसेविका नमिता पाटील व माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी बल्याणी चौकात शिवजयंती उत्सव साजरा केला. ढोलताशांच्या निनादाने जयघोष संपूर्ण बल्याणी परिसर दणाणून गेला होता. येथील लोकवस्तीसाठी पाण्याच्या पाइपलाइनसाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच येथील अनाथ, गरजू व गरीब लोकांसाठी अन्नदानही केले. (प्रतिनिधी)नेवाळीत उत्साहनेवाळी : कल्याण-श्रीमलंग रोडवरील नेवाळीनाका येथेही बुधवारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरा झाली. लांडगे यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी हिललाइन पोलीस ठाण्याचे मोहन वाघमारे, नेवाळीचे सरपंच चैनू जाधव, सुरेश पाटील, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, उपशाखाप्रमुख गोपीनाथ म्हात्रे, विलास पाटील, नाना डोंगरे, शाखाप्रमुख रवी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील आदींनी गर्दी केली होती. (वार्ताहर)