मुंब्रा : प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी येऊन “ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरू आहे,” असे विधान करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी चांगलेच फटकारले. “आम्ही जनतेचे जीव वाचविण्याला महत्त्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे येथे येऊन राजकारण करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. ही वेळ राजकारणाची नाही. टीका करण्यापूर्वी हिंमत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, अशा शब्दांत शानू पठाण यांनी सोमय्या यांचा समाचार घेतला. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे येथील कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्या यांना माघारी फिरावे लागले.
राजकारण करण्यासाठी सोमय्या येथे आले होते. जेव्हा मुंब्रा-कौसा भागात अनेक लोक मरत होते, तेव्हा ते कुठे होते? पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले, त्या वेळी सोमय्या कुठे होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आम्ही कोरोना रुग्णांना मदत करीत आहोत. आता हे लोक येऊन टीका करीत आहेत. अशी फुकटची टीका आम्ही सहन करणार नाही, असे पठाण म्हणाले.
.........
वाचली.