- नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत अभियान २०१८ च्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राने उल्लेखनिय कामगिरी केली असून ९ जानेवारी २०१८ पर्यंत २५६ शहरे हागणदारी मुक्त झाले आहेत. याशिवाय राज्यातील विविध शहरांतील दैनंदिन कच-यापासून १८ हजार ५९२.२ मेट्रीक टन सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याचा सिंहाचा वाटा आहे.यादीत गेल्या वर्षीच्या २०१७ च्या सर्व्हेक्षणात नवी मुंबईने देशात आठवा तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. मात्र, यंदा नवी मुंबईसह पुणे, ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवडमध्ये चुरस असल्याचे सांगण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळानुसार देशभरात या काळात ४० लाख ८४ हजार ६२० वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ट गाठण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचा वाटा पाच लाख ९६ हजार १७९ शौचालयांचा आहे. याशिवाय देशभरात दोन लाख ३४ हजार १६१ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून राज्यात ही संख्या ८९ हजार ५२५ इतकी आहे.देशभरातील विविध शहरांतील ५१ हजार ७३४ वॉर्डात डोअर टू डोअर कचºयाचे संकलन होत असून राज्यातील अशा वार्डांची संख्या ४३०० इतकी आहे. याशिवाय देशभरात एक लाख ६४ हजार ८९१.६ मेट्रीक टन कचºयापासून सेंद्रीय खताची निर्मिती होत असून त्यात राज्याचा वाटा १८ हजार ५९२.२ मेट्रीक टन इतका आहे. ठाणे महापालिका १५० मेट्रीन टन, नवी मुंबई महापालिका ६० मेट्रीन खत निर्मिती करते. शिवाय नवी मुंबई महापालिका प्लास्टिक दाण्यांची निर्मिती करीत असून त्यांचा वापर रस्ते बांधणी करीत आहे.2018च्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राने उल्लेखनिय कामगिरी केली असून ९ जानेवारी २०१८ पर्यंत २५६ शहरे हागणदारी मुक्त झाले.18,592मेट्रीक टन सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याचा सिंहाचा वाटा आहे.1494शहरांत स्वच्छ सर्व्हेक्षण- १८ सुरू असून यात देशात पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत येण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
राज्यात कच-यापासून होतेय १८,५९२ मेट्रीक टन खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:19 AM