प्रा. सिंधुताई रामटेकेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; उल्हासनगरात पक्षाची ताकद वाढणार

By सदानंद नाईक | Published: April 12, 2023 06:52 PM2023-04-12T18:52:21+5:302023-04-12T18:52:36+5:30

रामटेके ह्या निवृत्त प्राध्यापिका असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीवर कार्यरत असून त्यांनी ५ वर्षे महिला व बालकल्याण समिती तसेच हुंडा निर्मूलन समिती, अपारंपरिक ऊर्जा समिती, शांतता समिती अश्या अनेक क्षेत्रात काम केले आहे

Prof. Sindhutai Ramtek's entry into Congress; The strength of the party will increase in Ulhasnagar | प्रा. सिंधुताई रामटेकेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; उल्हासनगरात पक्षाची ताकद वाढणार

प्रा. सिंधुताई रामटेकेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; उल्हासनगरात पक्षाची ताकद वाढणार

googlenewsNext

उल्हासनगर - ज्येष्ठ समाजसेविका प्रा. सिंधुताई रामटेके यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यावेळी त्यांची पक्षाच्या निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड केल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली.

उल्हासनगरातील जेष्ठ समाजसेविका व निवृत्त प्राध्यापिका सिंधुताई रामटेके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पक्षप्रवेश देण्यात आला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने शहर काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी व्यक्त केला. पक्षाच्या निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेसगध्यक्षा राधिका मखमले यांच्या हस्ते रामटेके यांची विभागाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी पक्षाच्या गटनेत्या व माजी नगरसेवीका अंजली साळवे, कमिटीच्या पदाधिकारी उपाध्यक्ष लक्ष्मी गवई, सचिव कालिंदी गवई उपस्थित होत्या. काँग्रेस पक्षाप्रवेश वेळी प्रा. सिंधुताई रामटेके यांनी संविधानाने जी लोकशाही व्यवस्था देशाला दिली. ती व्यवस्था कुठेतरी डळमळीत होताना दिसते आहे. लोकशाहीचे चार स्तंभ खिळखिळे करण्याचा प्रयत्न होतो आहे. राहूल गांधीजींनी भारतात पदयात्रा काढून माणूस जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामार्गाने जनसामान्य लोकांपर्यंत जाऊन काम करणे हा प्रवेश करण्यामागचा एकमेव उद्देश आहे, असे मत व्यक्त केले.

रामटेके ह्या निवृत्त प्राध्यापिका असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीवर कार्यरत असून त्यांनी ५ वर्षे महिला व बालकल्याण समिती तसेच हुंडा निर्मूलन समिती, अपारंपरिक ऊर्जा समिती, शांतता समिती अश्या अनेक क्षेत्रात काम केले आहे, अनेक सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात. प्रा सिंधूताई रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर मध्ये काँग्रेस पक्षातर्फे अनेक निराधार व निराश्रित व्यक्तींना न्याय मिळेल व पक्ष संघटना अजून मजबूत होईल यात काही शंका नाही. अशी प्रतिक्रिया शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: Prof. Sindhutai Ramtek's entry into Congress; The strength of the party will increase in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.