शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

उल्हासनगरात व्यावसायिकांना मिळणार बाजार परवाना, महापालिकेत बाजार परवाना विभाग

By सदानंद नाईक | Published: October 14, 2023 5:47 PM

उल्हासनगरात १ लाख ८७ हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी २५ हजार मालमत्ता व्यापारीतत्वावर वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका मालमत्ता विभागामार्फत यापूर्वी व्यवसाय परवाना देण्याची कार्यवाही करण्यात येत होती. मात्र याबाबत मर्यादा उघड झाल्यावर बाजार परवाने हा स्वतंत्र विभाग केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. शहरातील व्यावसायिकांना बाजार परवाने दिल्यास, त्यापासून कोट्यवधींचे उत्पन्न पालिकेला मिळणार असल्याचे संकेत नाईकवाडे यांनी दिले आहे.

उल्हासनगरात १ लाख ८७ हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी २५ हजार मालमत्ता व्यापारीतत्वावर वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे. या व्यापाऱ्यांना यापूर्वी मालमत्ता विभागाच्या वतीने व्यवसाय परवाना दिला जात होता. मात्र विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता विभाग व बाजार आणि परवाना विभाग असे दोन स्वतंत्र विभाग करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या सर्व मालमत्ताचे विषय मालमत्ता विभागामार्फत हाताळले जातील. आणी शहरातील बाजार व व्यवसाय परवाने हे बाजार व परवाना विभागामार्फत दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. परवान्यातून महापालिकेला १५ कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

महापालिका मालमत्ता कर व पाणीपट्टी कर, शासनाचे विविध अनुदान, जीएसटी अनुदान, नगररचनाकार विभागातून बांधकाम परवाने आदीच्या उत्पन्नावर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा आहे. शहर विकासासाठी पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत महापालिका आयुक्त उपलब्ध करून देत आहे. फेरीवाला स्वछता कर, अग्निशमन विभागाचा ना हरकत परवाना, मोबाईल टॉवर्स पासून मिळणारे भाडे आदीतून महापालिकेला उत्पन्न सुरू झाले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाजार परवान्यांतून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यामुळे महसुली उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. या उत्पन्नातून शहरातील नागरिकांना जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शक्य होणार असल्याचे उपायुक्त नाईकवाडे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर