शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पांडुरंगाच्या प्रतिष्ठापनेने जिल्हा बँकांची प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:48 AM

राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित असून पंढरीला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणांना आर्थिक पाठबळ देणारी योजनाही सुरू करण्याची गरज आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित असून पंढरीला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणांना आर्थिक पाठबळ देणारी योजनाही सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे पांडुरंगाचे स्मरण होऊन बँकांची उत्तरोत्तर प्रगती होण्यास मदत होईल, असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केले.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात विठू माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखमुख यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी बँकेचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे, सीईओ भगीरथ भोईर, आमदार संजय केळकर, संचालक मंडळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, डीडीआर ठाणेचे शहाजी पाटील, पालघरचे संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा बँकांसाठी उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन केले.मूर्तीमुळे बँकेत आनंदी आनंदपांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास बँकेतील रोजचे वातावरण सांप्रदायीक, आनंदी, प्रसन्न ठेवण्यास मदत होईल. पदाधिकारी आणि अधिकाºयांना पांडुरंगाचे सतत स्मरण होत राहील. यामुळे परमेश्चर कृपेने बँकेच्या कामकाजात कोणत्याही चुका होणार नाहीत. बँकेची उन्नती होईल, असे देखमुख म्हणाले. जिल्हा बँकांनी वारकरी संप्रदायासाठी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घेणे शक्य व्हावे, त्यासाठी उद्भवणारी आर्थिक चणचण दूर व्हावी, यासाठी जिल्हा बँकांनी पंढरपूर तीर्थयात्रेला जाणाºया भाविकांसाठी कर्ज योजना हाती घेऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाविकांसाठीच्या पंढरपूर तीर्थयात्रा कर्ज योजनेमुळे बँकांची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि भाविकांची वारीही पूर्ण होण्यास मदत होईल. असे ते म्हणाले.>टीडीसी बँकेचे काम उत्तमया दौºयाप्रसंगी त्यांनी टीडीसीसी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. शेतकरी कर्जमाफीसह बचत गटांच्या कामातही टीडीसीसीची कामगिरी उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले. ठेवीच्या तुलनेत बँकांनीकर्जांचे अधिकाधिक वितरण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी अन्य पदाधिकाºयांसह वरिष्ठ अधिकाºयांशी सहकारच्या विविध विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.