ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. हा मनाई आदेश ३० एप्रिलपासून १४ मेपर्यंत लागू राहणार आहे. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय १० मे रोजी शब-ए-कदर व १३ मे रोजी परंपरेनुसार शिवजयंती व १४ मे रोजी रमजान ईद आदींसह अक्षयतृतीया, छत्रपती संभाजी राजे जयंती असे सण- उत्सव या काळात संपन्न होणार आहेत. यादरम्यान सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.
..............