शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा मनाई आदेश लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 5:10 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सध्या लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातही पुन्हा पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे आणि कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला याद्वारे मनाई आहे.

ठळक मुद्दे सर्व प्रकारच्या आंदोलनाला बंदीपोलीस आयुक्तांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सध्या लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातही पुन्हा पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. सर्व प्रकारची आंदोलने तसेच पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे आणि कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला याद्वारे मनाई आहे. हा आदेश १५ मे पासून २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.या आधी हे आदेश १ मे ते १४ मे पर्यंत लागू केले होते. पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, निदर्शने यासह विविध प्रकारच्या आंदोलनाला बंदी घातली आहे.कोरोनासारख्या साथीच्या आजाराला अटकाव घालण्यासाठी तसेच आयुक्तालयाच्या क्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे आदेश जारी केले आहेत.त्यामुळे कोणीही तलवारी, भाले, बंदुका यासारखे कोणतेही शस्त्र बाळगू किंवा विक्री करु नये.सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, गायन आणि वाद्य वाजविणे किंवा एखाद्याच्या प्रतिमेचे दहन अशा सर्वच बाबींना यातून मनाई आहे. राज्यातील शांतता धोक्यात आणणे, प्रक्षोभक भाषण करणे, विचित्र हावभाव करणे, मिरवणूका आणि घोषणा प्रतिघोषणा देणे आदींचाही यात समावेश आहे.* केवळ शासकीय कर्मचारी, विवाह कार्यासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी जमलेले लोक आणि त्यासाठी काढलेली मिरवणूक त्याचबरोबर न्यायालयीन कामकाज, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांना यातून वगळले आहे. हा आदेश १५ ते २९ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. मेकला यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस