शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 9:25 PM

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या आंदोलनांना मनाई आदेशाद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. १ ते १५ मार्च २०२१ या १५ दिवसांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या आंदोलनासह मिरवणूकीला बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या आंदोलनांना मनाई आदेशाद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. १ ते १५ मार्च २०२१ या १५ दिवसांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे.या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि घेराव आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. ११ मार्च रोजी महाशिवरात्री तसेच छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन तर १२ मार्च रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव होणार आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलमानुसार तलवारी, लाठया असे कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला मनाई केली आहे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे आदींनाही मनाई आहे. सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच अंत्यसंस्कार आणि लग्न समारंभ यासाठी हा आदेश लागू राहणार नसल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस