कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न मोठा आहे. रस्ते, वाहतूककोंडी आणि शहर स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे. याशिवाय, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी आठवडाभरात बैठक घेतली जाईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.
गोविंद बोडके यांच्या जागी नियुक्ती केलेले आयुक्त सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पदभार सांभाळला. पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महापालिका क्षेत्रात नागरिकीकरण झपाट्याने होत असून, त्यामुळे पायाभूत सोयीसुविधांची आवश्यकता आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासह रिंगरोड, दुर्गाडी खाडीपूल तसेच पत्रीपुलाचेही काम सुरू आहे. याशिवाय, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते विकासही सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतानाच शहर स्वच्छतेवरही भर दिला जाईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेले उपक्रम पुढे नेले जातील. स्वच्छ सुंदर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ब्रीदवाक्य घेऊन पालिका काम करणार आहे.
महापालिकेवर भ्रष्टाचाराचा शिक्का आहे. अनेक अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत पकडले गेले आहेत. यावर काय करणार, असा सवाल केला असता, भ्रष्टाचार आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.आॅनलाइन सेवेला प्राधान्यच्जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना नागरिकांना बहुतांश सेवा आॅनलाइन देण्याचे काम केले होते. त्याच धर्तीवर नागरिकांना सेवा देताना मानवी हस्तक्षेप टाळण्याचे जास्तीतजास्त प्रयत्न केले जातील. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.च्महापालिकेची दोन मोठी रुग्णालये आहेत. महापालिकेचे उत्पन्न कमी असून, रुग्णालयात डॉक्टरांची उणीव भासते. त्यामुळे सामान्यांना आरोग्यसेवा देता येत नाही.च्जिल्हा परिषदेच्या धर्तीवर वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने कंत्राटी डॉक्टर भरती करणे किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घेणे शक्य आहे का, हे तपासले जाईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.आधारवाडी डम्पिंगची केली पाहणीकल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ही कल्याण-डोंबिवलीची सर्वात मोठी समस्या आहे. या ग्राउंडची पाहणी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच केली. या ग्राउंडचे क्षेत्र किती आहे, दररोज किती कचरा येतो, त्यावर काय उपाययोजना करणे शक्य आहे, याविषयीची माहिती आयुक्तांनी घेतली. डम्पिंगची दुर्गंधी रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्यासंदर्भात आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना सूचना केली. यापूर्वीच्या आयुक्तांनीही डम्पिंगची पाहणी करून ते बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आले नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आव्हान नव्या आयुक्तांपुढे कायम आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगूळ, सहायक आयुक्त गणेश बोरोडे, सहायक अधिकारी अगस्टीन घुटे आदी यावेळी त्यांच्यासोबत होते.