ठाणे : जिल्हाधिकारीपदी नव्याने रु जू झालेल्या डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पहिलीच बैठक पाणीटंचाईसंदर्भात घेऊन विशेषत: मुरबाड, शहापूर भागात येणाऱ्या काळात आवश्यकतेप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, त्याचप्रमाणे विंधन विहिरींची कामे कोणत्याही परिस्थितीत महिनाभरात पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश दिले. ठाणे जिल्ह्यात कुठे कुठे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे याचा आढावा घेतला तसेच कुठल्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन संबंधित यंत्रणांनी व्यविस्थत करावे अशा सुचना दिल्या. सध्या शहापूर तालुक्यात १७ टँकरद्वारे ८५ पाडे आणि ३० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी याच सुमारास २३ गावे आणि ८० पाड्यांना टँकर्स सुरु होते. ज्या गावात पाणीटंचाई जास्त जाणवत आहे तिथे प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. मुरबाड भागात पाटगाव, देदरी, तळेखल, तुळई या ४ गावांना आणि १२ पाड्यांना २ टँकर्सने पाणी पुरविण्यात येत आहे ,अशी माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)एकंदर १११ विंधन विहिरी मंजूर झाल्या असल्या तरी ज्या गतीने त्यांचे काम पूर्ण व्हायला पाहिजे तसे झालेले नाही असे सांगून जिल्हाधिकाऱ््यांनी तातडीने उर्वरीत कामांच्या वर्कआॅर्डर्स देऊन कामे सुरु करून महिनाअखेरपर्यंत ते संपवा असे निर्देश दिले.
मुरबाड, शहापूरच्या पाणीटंचाईचे योग्य नियोजन करा
By admin | Published: May 03, 2016 12:43 AM