सदानंद नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : देशातील काही शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविकांनी महासभेत मांडलेला उल्हासनगरातील दारूबंदीचा प्रस्ताव सोमवारी बहुमतानी मंजूर झाल्याने, बारमालक व दारूच्या दुकानदारात खळबळ उडाली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी महासभेत दिले. राज्य शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर दारुबंदी लागू करणारी ही बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरेल.उल्हासनगरात डान्सबार, बार, हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग, हुक्का पार्लर आदीच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असून अंमली पदार्थ विक्रीचा धंदा तेजीत आहे. याप्रकाराने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी केला. याप्रकाराला आळा घालण्यासाठी व शेकडोंचे संसार उघडे होण्यापासून वाचवण्यासाठी गावात दारूबंदी लागू करण्याप्रमाणे शहरात दारूबंदी लागू करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत आणला होता. विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, भाजपचे गटनेता जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, मीना सोंडे, प्रमोद टाले यांच्यासह विविध पक्षाच्या नगरसेवकांनी दारूबंदीबाबत मते मांडली. अखेर दारूबंदी लागू करण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देत प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.महापालिका महासभेत प्रथमच दारूबंदीच्या प्रस्तावावर सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आल्याचे चित्र महासभेत दिसले. दारूबंदीला विरोध दिसायला नको, म्हणून काही सदस्यांनी दारूबंदीच्या प्रस्तावाला नाईलाजास्तव मंजुरी दिली, अशी कबुली काही सदस्यांनी दिली. गेल्या काही वर्षात शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली, असा ठाणे आयुक्तालयाचा अहवाल सांगतो. शहरात गांजा यासारख्या अंमली पदार्थासह गावठी दारू ची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी केला. हॉटेल, बार, महिला डान्सबार, लॉजिंग-बोर्डिंग, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर आदीमुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे सुर्वे म्हणाले. सदर ठरावाची महासभा इतिवृत्ताची वाट न पाहता, अंमलबजावणी करण्याची मागणी बहुंताश नगरसेवकांनीआयुक्तांकडे केली.गावाप्रमाणे उल्हासनगरात दारूबंदी कायदा लागू करावा- वसुधा बोडारेएखाद्या गावातील ग्रामपंचायतीने ठरवा केल्यावर त्या गावात दारूबंदी लागू होते त्याप्रमाणे उल्हासनगर शहरात दारूबंदी लागू करावी. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होईल, असे मत शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे यांनी व्यक्त केले. महापालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करणारी ही देशातील पहिली महापालिका असेल, असे मत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. शहरात दारूबंदी लागू झाल्यास नागरिक, कॉलेज तरूणी, महिला, मुले आदीच्या मनातील भीती कमी होईल, असेही चौधरी म्हणाले.कलानी यांच्या साम्राज्याला हादरा : उल्हासनगरातील पप्पू कलानी यांचे साम्राज्य एकेकाळी दारु व्यवसायावर उभे राहिले. त्याच शहरावरील कलानी कुटुंबाची पकड ढिली झाली आहे. भाजपने कलानी कुटुंबातील व्यक्तीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे टाळले तर विधानसभा निवडणुकीत ज्योती कलानी यांचा भाजपच्या कुमार आयलानी यांनी पराभव केला. काल-परवापर्यंत उल्हासनगरची आमदारकी व महापौरपद कलानी यांच्या घरात होते. सध्या त्यांच्याकडे कुठलेही राजकीय पद नाही. त्यामुळे दारुबंदीचा प्रस्ताव मंजूर झाला तर कलानी यांच्या साम्राज्याला धक्का बसेल, असे बोलले जाते.आयुक्तांची भूमिका महत्त्वाची : शिवसेनेच्या नगरसेविकांनी मांडलेला अशासकीय ठराव मंजुरीकरिता राज्य शासनाकडे पाठवायचा किंवा कसे, याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत. उल्हासनगरात शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली असून या ठिकाणी डान्सबार, बार मोठ्या संख्येनी आहेत. त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना होणाºया कमाईत वाढ करण्याकरिता तर दारुबंदीचे अस्त्र उचलले गेले नाही ना? अशी शंका काही
उल्हासनगरातील दारूबंदीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:36 PM