ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास आता येत्या काळात शक्य होणार आहे. या गावांचा समावेश नवीन ठाणेमध्ये करून या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका व एमएमआरडीए यांची संयुक्त नेमणूक केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत ठाणे महापालिकेने मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर धोरणात्मक बाब म्हणून शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानुसार, ज्या पद्धतीने मुंबईच्या जवळ नवी मुंबई हे शहर उदयास आले. त्याच धर्तीवर आता भविष्यात हे नवीन ठाणे उदयास येणार आहे.
येत्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव पटलावर आहे. ठाणे महापालिका क्षेत्रालगत उल्हास नदी असून या नदीच्या पलीकडील पायगाव, शिलोत्तर, खारबाव या भागातून वसई, अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रादेशिक आराखड्यात दर्शवण्यात आले आहे. तसेच खारबाव येथून ठाण्यातील घोडबंदर रस्त्यास जोडरस्तासुद्धा प्रादेशिक आराखड्यात दर्शवण्यात आला आहे. सद्य:स्थितीत ठामपा क्षेत्राचा वेगाने होणारा विकास पाहता भविष्यात लोकसंख्या सामावून घेणे शक्य होणार नाही.भविष्यात घोडबंदरही पडणार कमीच्सध्या शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात आहे. त्यातही जुन्या ठाण्यात म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी नवीन विकासकामे होणे कठीण झाले आहे. केवळ घोडबंदरलाच सध्या नव्याने विकासकामे आणि प्रकल्प सध्या येत आहेत.च्परंतु, भविष्यात घोडबंदरसुद्धा या सर्व सोयीसुविधांना सामावून घेण्यात कमी पडणार आहे. याचाच विचार करून आणि एकूणच परिसरातील व्यावसायिक क्षेत्राची कमतरता लक्षात घेऊन नवीन ठाणे महापालिका क्षेत्राला जोडण्याचा विचार केला आहे.च्ज्या पद्धतीने मुंबईच्या बाजूला नवी मुंबई शहर हे विकसित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता ठाण्याची भविष्यातील सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता, भविष्यात येथेसुद्धा नवीन ठाणे उदयास येणार आहे. ठाण्याला सध्या असलेली लोकांची पसंती पाहता या नवीन ठाण्यालाही प्रतिसाद मिळेल.