ठाणे : ठाणे स्टेशनवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ठाणे-मुलुंडदरम्यानच्या प्रस्तावित ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन येत्या दोन महिन्यांच्या आत करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. नवीन स्थानकाचा आराखडा रेल्वेने तयार केला आहे. हे स्थानक ठाणे होम प्लॅटफॉर्म असून, हायवेवर उभारण्यात येणार आहे. यासाठी मनोरुग्णालयाची जागा तसेच पालिकेची जागा देण्यात येणार आहे. खासदार राजन विचारे त्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा करीत आहेत. या कामाचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाला असून, नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन दिवाळीआधी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, यातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी दिल्ली रेल्वेचे नोडल आॅफिसर, रेल्वेचे जीएम, राज्य शासनाचे प्रतिनिधी आणि पालिका आयुक्त अशी चार जणांची एक कमिटी तयार केली आहे. (प्रतिनिधी)
प्रस्तावित स्थानकाचे भूमिपूजन दिवाळीआधी
By admin | Published: July 30, 2016 3:33 AM