शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

मासळी बाजाराबाहेरील गाळ्यास केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:33 PM

संडे अँकर । भार्इंदर पालिकेचा निषेध : आमची फसवणूक केल्याचा महिला विक्रेत्यांचा आरोप

मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती क्र. १ च्या इमारतीत तळ मजल्यावर असलेल्या मासळी बाजारात तसेच प्रवेशद्वाराभोवती गाळे काढण्याच्या पालिकेच्या प्रयत्नास मासेविक्रेत्या महिलांनी विरोध केला आहे. महापालिकेची जागा नसताना आमची फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षनेते राजू भोईर यांची भेट घेऊन गाºहाणे मांडले. तर, मासळी बाजाराबाहेर गाळे बांधून रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित सात गाळेधारकांना स्थलांतरित करणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

भार्इंदर पोलीस ठाण्याजवळील मासळी बाजार हा पूर्वापार चालत आलेला आहे. आधी तो मोकळ्या जागेत भरत असे. परंतु, पालिकेने महिलाविक्रेत्यांना मासळी बाजार बांधून देण्याचे आश्वासन देऊन चक्क इमारतच उभी केली. त्यामध्ये तळ मजल्यावर मासळी बाजार व गाळे तर वर आरोग्य केंद्र, प्रभाग कार्यालय आदी चालवले जात आहे. मुळात ही जागा पालिकेची नसताना त्यावेळी पालिका कार्यालयासाठी विक्रेत्यांची फसवणूक करून बाजाराची मोकळी जागा पालिकेने बळकावल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.त्यातच मासळी बाजारासमोर असलेल्या सुमारे सहा ते सात छोट्या टपऱ्या हटवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वास्तविक, हा रस्ता विकास आराखड्यातीलच नाही. परंतु, रस्ता रुंद केल्यास नाझरेथ शाळेत जाणारे विद्यार्थी यांची गर्दी टळेल, तसेच मागील बाजूला असलेल्या शास्त्रीनगरमध्ये मोठी वाहने जाऊ शकणार आहेत. त्यासाठी पालिकेने येथील टपºया हटवून त्यांना थेट मासळी मार्केटमध्ये आणि प्रवेशद्वाराबाहेर पक्के गाळे बांधून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. बाजाराच्या प्रवेशद्वाराभोवती गाळ्यांचे बांधकाम सुरू केले आहे.मासळी बाजारात गाळे बांधणार नाही. प्रवेशद्वाराबाहेर गाळे बांधून टपरीधारकांना त्यात स्थलांतरित करून रस्ता रुंद करणार आहोत. शाळा आणि शास्त्रीनगरवासीयांच्या सोयीसाठी रुंदीकरण करतोय. - दीपक खांबित, कार्यकारी अभियंता गरिबांवरच दादागिरी आणि मनमानी केली जाते. मूळची जागा मासळी बाजाराची. त्यावर पालिकेने जमीन त्यांची नसताना इमारत बांधली. त्याचीही तक्रार नाही. गाळेधारकांना जागा द्या, पण ती मासळी बाजाराच्या आवारात कशाला? आमचा विरोध राहील. नाइलाज झाल्यास आंदोलन करू. - ज्योत्स्ना दंड्रे, मासेविक्रेती 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे