कल्याण - सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची 280 पदे भरण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येत्या महासभेत मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. प्रशासनाच्या कंत्राटी भरतीस विरोध करण्याकरीता 26 फेब्रुवारीला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
संघटनेचे राष्ट्रीय सूरजपाल चिंडालिया यांनी सांगितले की, महापालिकेच्या सफाई खात्यात आजमितीस कार्यरत असलेल्या सफाई कामगारांची संख्या 2 हजार 300 आहे. महापालिकेची लोकसंख्या 15 लाखाच्या घरात आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार महापालिकेत 5 हजार सफाई कामगार हवेत. प्रत्यक्षात 2 हजार 300 सफाई कामगार आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार 3 हजार सफाई कामगारांची भरती करणो आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षात महापालिकेत सेवानिवृत्त झालेले, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले, मृत पावलेल्या सफाई कामगारांची संख्य 350 इतकी आहे. त्यामुळे महापालिकेच्या सफाई खात्यातील रिक्त झालेली 350 सफाई कामगारांची पदे अद्याप भरलेली नाही. त्यांच्या वारसांना त्या जागी कामावर घेतले पाहिजे. लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काचे प्रकरण एका महिन्याच्या आत निकाल काढले पाहिजे. ही प्रकरणो निकाली काढण्यास महापालिकेस तीन वर्षाचा कालावधी लागला आहे.
महापालिकेने 350 रिक्त पदे न भरता काही प्रभागातील कच:याचे खाजगीकरण करण्याच्या नावाखाली 100 वाहन चालकांची भरती व 280 सफाई कामगार कंत्रटी पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर केला आहे. हा प्रस्ताव येत्या महासभेत अंतिम मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्या ऐवजी खाजगीकरणच्या माध्यमातून कंत्रटदाराचे खिसे भरण्याचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महापालिकेच्या पैशातून कंत्रटदार गब्बर होणार. त्याऐवजी रिक्त पदे भरल्यास महापालिकेच्या सफाई कामगारांच्या संख्येत 350 ने वाढ होईल. काही प्रभागातील कचरा खाजगीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने घंटा गाडय़ा खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याच्या निविदा सहा वेळा मागवून देखील त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. घंटा गाडय़ा येण्या आधीच वाहनचालकांची भरती केली जात आहे.
यापूर्वी अॅन्थोनीला महापालिकेने कचरा उचलण्याचे कंत्रट दिले होते. त्याच्याकडून समाधानकारक काम होत नव्हते. त्यामुळे त्याचे कंत्रट महापालिकेने रद्द केले. त्याने महापालिकेकडून कोटय़ावधी रुपयांची बिले लाटली. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानात कचरा प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीतून महापालिकेने 1क्क् कचरा वाहक वाहने खरेदी केली. ही वाहने अॅन्थोनीला दिली गेली. अॅन्थोनीने त्याची वाट लावली. ती भंगार झाल्यावर महापालिकेच्या ताब्यात दिली. हा अनुभव महापालिकेच्या गाठीशी असताना महापालिका पुन्हा कच:याचे खाजगीकरण करुन वाहन चालकांसह 280 कंत्रटी सफाई कामगाराची भरती करीत आहे. यावरुन महापालिकेने काही एक धडा घेतलेला नाही याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. या सगळ्य़ाच्या विरोधात 26 फेब्रुवारीला महापालिकेवर मोर्चा काढून सफाई कामगार निषेध व्यक्त करणार आहे. त्याची नोटिस प्रशासनाला देण्यात येणार आहे.