- सदानंद नाईक उल्हासनगर - घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस यांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी युवक मोर्चाच्या वतीने शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करून केंद्रीयमंत्री अरुणा इराणी गेल्यात कुठे? असा प्रश्न विचारण्यात आला.
उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या युवा आधाडीने जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या किमती बाबत चिंता व्यक्त करून, वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात घोषणाबाजी करून वाढत्या किमतीचा निषेध केला. पप्पु कलानी, शहराध्यक्षा पंचम कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आंदोलन केले गेले. पक्षाचे शहर प्रवक्ता कमलेश निकम यांनी यावेळी मार्गदर्शन करून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, सीएनजी गॅसच्या वाढत्या किमती विरोधात आंदोलन करणाऱ्यां केंद्रियमंत्री अरुणा इराणी गेल्या कुठे? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
राष्ट्रवादी पक्षाचे युवा अध्यक्ष नरेश साळवी, कार्याध्यक्ष हरदीप सिंह, पंकज त्रिलोकानी, महिला अध्यक्ष शोभा जाधव, युवती सेल अध्यक्ष धनी आवले, उर्मिला गुप्ता यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्ते आंदोलनांत सहभागी झाले होते. देशात अशीच महागाई वाढत राहिल्यास देशाची स्थिती श्रीलंका सारखी होण्याची शक्यता पक्षाचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी व्यक्त केली.