शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

नर्मदा बचओ आंदोलांनाच्या पाठिंब्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने 

By सुरेश लोखंडे | Published: June 18, 2024 2:20 PM

नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन जेष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले आहे.

ठाणे : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन जेष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू असून हजारो आंदोलक  त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम आहेत. या न्याय्य मागण्या मान्य करून या आंदोलनाला वेळीच थांबवण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  ठाणे जिल्हाधिकार्याच्या मार्फत मागण्याचे निवेदन देण्यात आले.       सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही प्रमुख मागणी घेऊन पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुडीत क्षेत्रातील हजारो गांवकरी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठीबा देऊन न्याय्य मागण्या मान्य कराव्या यासाठी येते निदर्शने करून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत देण्यात आले. या निदर्शनात श्रमिक जनता संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश खैरालिया, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय डॉ. संजय गोपाळ, भारत जोडो अभियानचे  राजेंद्र चव्हाण, बहुजन विकास संघाचे महासचिव नरेश भागवाने,  कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति निमंत्रक भास्कर गव्हाळे आदी नेते कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग घेतला.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही  शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करायचे बाकी आहे. मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे.  त्यांचे पुनर्वसन करा, सिद्ध झालेली बॅकवॉटरची पातळी (जुनी) स्वीकारा. बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या. कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा.  मागण्या  पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा आदींसाठी आज ही निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे