लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाºया तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाºया अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. राष्टÑपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंबंधी कारवाईचे निवेदन जैन संघटनेच्या वतीने देण्यात आले.श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ, ठाणे आणि श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अॅन्ड ज्ञाती ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम सोलंकी आणि व्यस्थापकीय विश्वस्त उदय परमार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनोप मंडल ही जैन आणि हिंदू विरोधी संघटना असून राजस्थान, गुजरात, महाराष्टÑ, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात जैन धर्म, जैन साधू आणि साध्वी यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात विपर्यस्त विचार पसरविण्याचे काम करीत आहेत. भारतासह जगभरात येणारे प्रत्येक संकट आणि नैसर्गिक आपत्तीला जैन लोक कारणीभूत असल्याचा अपप्राचारही ही संघटना गावा गावात करीत आहे. भूकंप, महापूर, आतंकवादी हल्ले आणि ग्लोबल वार्मिंगलाही जैन समाजच कारणीभूत असल्याचे नाहक पसरविले जात आहे. जैन साधू आणि साध्वी हे काळी जादू करुन महापूर, कोरोनासारखे साथीचे आजार आणल्याचाही या अपप्रचारात समावेश आहे. रस्ते अपघातात अनेक पायी जाणाºया जैन साधू आणि साध्वींचे अपघाती निधन झाले आहे. शेकडो साधूंच्या या अपघाती मृत्यु होण्यामागेही अनोप मंडल संघटनेचा हात असण्याची भीतीही जैन संघटनेने व्यक्त केली आहे. अनोप मंडलची चौकशी केली जावी. या संस्थेचे प्रमुख मुकनाराम प्रजापती यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई केली जावी. त्याचबरोबर या संस्थेकडून चालविण्यात येणारे संकेतस्थळ, ट्वीटर, एफबी, व्हॉटसअॅप आणि यूटयूब सारखी सोशल मिडियाची खातीही बंद केली जावी. तसेच या मंडळाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी जैन समाजाच्या १४ संघटनांचे पदाधिकारी तसेच १५० महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
जैन समाजाची बदनामी करणाऱ्या तसच अपप्रचार करणाºया अनोप मंडल संस्थेचा ठाण्यात निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 11:33 PM
जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाºया तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाºया अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
ठळक मुद्देजैन समाज बांधवांनी केले आंदोलनजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन