शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महात्मा गांधी पुतळा खाली काळ्या फिता लावून ठिय्या, राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 2:19 PM

एसटी कामगारांनी मर्यादा ओलांडून गुन्हेगाराप्रमाणे पवार साहेब यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध पक्षाच्या शहाराध्यक्षा पंचम कलानी यांच्यासह शहर कार्यकारिणीने केला. एसटी कामगाराच्या पाठीमागे सदैव उभे राहणाऱ्याच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे कामगार होऊ शकत नाही, अशी नाराजी शहर पदाधिकार्यांनी दिली.

उल्हासनगर महापालिका प्रांगणात महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या खाली राष्ट्रवादी पक्षाच्या शहाराध्यक्ष पंचम कलानी, पक्षाचे पदाधिकारी मनोज लासी, कमलेश निकम, शिवाजी रगडे, पियुष गोयल, सुंदर मुदलियार यांच्यासह असंख्य पदाधिकारी सकाळी साडे ११ वाजता एकत्र आले. त्यांनी काळ्या फिती बांधून राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला. भर उन्हात त्यांनी काही काळ ठिय्या आंदोलन करून हल्ल्या मागील मास्टर माईंड याला अटक करण्याची मागणी केली. तसेच एसटी कामगारांनी मर्यादा ओलांडून गुन्हेगाराप्रमाणे पवार साहेब यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

शहाराध्यक्ष पंचम कलानी एक अप्रत्यक्ष शक्ती समाजासमाजा मध्ये तेढ निर्माण करीत असून याप्रकारने देश पुढे जाण्या ऐवजी मागे येत असल्याचे सांगून हल्ल्याचा जोरदार विरोध केला. काळ्या फिती लावून भर उन्हात ठिय्या देणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा देऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस