नजीब मुल्ला समर्थकांचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निर्दशने

By अजित मांडके | Published: July 3, 2023 07:41 PM2023-07-03T19:41:00+5:302023-07-03T19:41:11+5:30

ठाणे : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात जल्लोष केला. एकीकडे पेढे वाटत अजित पवार जिंदाबादच्या ...

Protests against Jitendra Awad by Najeeb Mulla supporters | नजीब मुल्ला समर्थकांचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निर्दशने

नजीब मुल्ला समर्थकांचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निर्दशने

googlenewsNext

ठाणे :अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात जल्लोष केला. एकीकडे पेढे वाटत अजित पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या बॅनरला लाथा मारल्या. या बॅनरवर बंटी, बबली असा उल्लेख करीत त्यांनी मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.

राष्ट्रवादीमध्ये असलेला अंतर्गत कलह आता अजित पवार यांनी वेगळी चुल मांडल्यानंतर अधिकच पेटला आहे. नजीब मुल्ला यांनी अजित पवारांबरोबर असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता ठाण्यातही मुल्ला विरुध्द आव्हाड हा संघर्ष अधिकच पेटू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील ठाणेकरांनी या दोघांमधील संघर्ष पाहिला आहे. परंतु आता हा संघर्ष उघडपणे सुरु झाल्याचे दिसत आहे. ठाण्यात सोमवारी विश्रामगृह येथे नजीब मुल्ला समर्थकांनी अजित पवार साहेब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. अजित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ हे म्हणत त्यांनी एकमेकांनी पेढे देखील भरविले.

या जल्लोषात मोहसीन शेख, वीरु वाघमारे यांच्यासह काही पदाधिकारी हजर होते. यावेळी हाती राष्टÑवादीचा झेंडा घेत त्यांनी जल्लोष केला. मात्र दुसºयाच क्षणाला प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचे फोटो असलेले बॅनरवर आव्हाड यांचा उल्लेख बंटी आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या फोटो खाली बबली असा उल्लेख करण्यात आला होता. हे बॅनर पाया खाली तुडवत त्यांनी या दोघांचाही निषेध केला.

 

Web Title: Protests against Jitendra Awad by Najeeb Mulla supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.