लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल यांच्या दुरुस्तीचे काम आणि नवीन प्रकल्पांच्या कामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठविण्याचे आदेश जिल्ह्यातील यंत्रणांना ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टास्क फोर्सची पहिली बैठक मंगळवारी घेतली. यावेळी सर्व पालिका आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ दिवसांत वाहतूककोंडी दूर करणारा आराखडा पाठविण्याचे आदेश दिले.
पालकमंत्र्यांना अहवाल देणारवाहतूक नियोजनाचा आराखडा प्राप्त झाल्यानंतर एप्रिलमध्ये टास्क फोर्सची बैठक पुन्हा एकदा घेतली जाईल. विविध यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक शाखेची बैठक घेऊन संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी नियोजन केले जाईल. या नियोजनाच्या आराखड्याचा अहवाल पालकमंत्र्यांकडे पाठवून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.