ठाणे : प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचा-यांच्या तक्रारी, समस्यांबाबत थेट त्यांच्याशीच संवाद साधून लवकरात लवकर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिले.प्रादेशिक मनोरुग्णालयातून माहिती दिली जात नाही. दिलीच तर ती ठराविक लोकांना देण्याची सक्ती काही अधिकाºयांकडून कर्मचाºयांना केली जात असल्याचा प्रश्न ‘लोकमत’ने आरोग्यमंत्र्यांना केला असता त्यांनी हे आश्वासन दिले. काही अधिकाºयांकडून कर्मचाºयांना त्रास होत असेल तर त्याबाबत त्यांच्यांशीच चर्चा करेन, असे डॉ. सावंत म्हणाले. मनोरुग्णांनी बनविलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट देऊन मनोरुग्णांशी संवादही साधला. त्यानंतर सप्तसोपान या डे केअर सेंटरला भेट दिली.पाण्याची सोय करा हो : आरोग्यमंत्र्यांसमोर व्यथामनोरुग्णालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. सावंत हे खाली बसलेल्या मनोरुग्णांशी संवाद साधण्यास आले. यावेळी त्यांनी महिला मनोरुग्णांना त्यांची नावे विचारली. त्याचक्षणी तेथील एका मनोरुग्णाने त्यांच्यासमोर काकुळतेने मनोरुग्णालयातील तक्रारींचा पाढा वाचला. आम्हाला येथे पाण्याची सोय करा हो, असे ती तळमळीने त्यांना सांगत होती. हे ऐकून डॉ. सावंत हे पुढच्या मनोरुग्णाशी संवाद साधण्यास गेले.
मनोरुग्णालय कर्मचा-यांशी थेट संवाद साधणार : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:37 AM