उल्हासनगर - दिलीप मालवणकर लिखित उल्हास दर्पण या पुस्तकाचे प्रकाशन २० सप्टेंबर रोजी रात्री टाऊन हॉल मध्ये महापालिकेचे माजी आयुक्त आर डी शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ शिवरत्न शेटे यांच्या शिव व्याख्यान झाले असून गायिका पुष्पाताई पागदधरे, अनिल गवस, अरुण म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगरचा इतिहास व माहिती स्थळाबाबतची माहिती उल्हास दर्पण पुस्तकातून दिलीप मालवणकर यांनी दिली. पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी ६ वाजता महापालिकेचे माजी आयुक्त आर डी शिंदे यांच्या हस्ते झाले. पुस्तक प्रकाशनानंतर प्रख्यात शिव व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे याचे व्याख्यान झाले. यावेळी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका पुष्पाताई पागधरे, अभिनेते अनील गवस, कवीI अरूण म्हात्रे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदी जण उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करून कोरोना काळात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. पुस्तक प्रकाशन वेळी महापालिकेचे माजी आयुक्त आर डी शिंदे यांनी महापालिका कारभाराच्या जुन्या आठवणी जागविल्या आहेत.यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.