लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा शुभांरभ रविवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाला. पुढील पाच दिवस घरोघरी या बालकांना पोलीओ डोस देण्याची मोहिम सुरू राहणार असून त्यासाठी घरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर म्हस्के यांनी केले आहे.ठाणे महानगरपालिकेच्या आझादनगर आरोग्य केंद्रावर या पल्स पोलीओ मोहिमेचे उदघाटन महापौरांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकाला पोलिओ डोस देऊन करण्यात आले. कार्यक्र मास स्थानिक नगरसेवक मधुकर पावशे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर, डॉ. देवगीकर आणि डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते. आझादनगर आरोग्य केंद्रास एक वर्षे पूर्ण झाल्याबददल या कार्यक्र माचे आयोजन या केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी केले होते. कोविड काळात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाºयांबरोबरच आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स यांनीही आपला जीव धोक्यात घालून काम केले होते. या कर्मचाºयांचा गौरव करु न त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर म्हस्के याठिकाणी उपस्थित होते. यावेळी महापौरांनी सर्व आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांनी कोविड काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच त्यांना भविष्यातील कामासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या. कोविड काळात सर्वांची काळजी घेणाºया डॉक्टरांचा सन्मान आणि आदर नागरिकांनी देखील केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. स्थानिक नगरसेवक मधुकर पावशे यांचे देखील सहकार्य आझादनगर आरोग्य केंद्रास वेळोवेळी मिळत असते याबददल महापौरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.सर्व बालकांना योग्य वयात प्राथमिक लसीकरण, नियमति ए.एफ.पी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलीओ मोहिमेतंर्गत शून्य ते पाच वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे यासाठी १९९५ पासून ही उपराष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कोविड महामारीनंतर रविवारपासून या मोहिमेस सुरूवात करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये या लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच घरोघरी येऊन पोलीओ डोस देणारे आरोग्यसेवक, आशा वर्कर्स यांना नागरिकांनी सहकार्य करावे आणि पालकांनी शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना डोस द्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.