कल्याण: पुलवामा येथे शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना रांगोळी माध्यमातून श्रद्धांजली कलाशिक्षक यश महाजन यांनी वाहिली आहे. कल्याण येथील गायत्री विद्यामंदीरात ही रांगोळी साकारली आहे. शाळेतील मैदानात रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. महाजन यांनी चार बाय आठ फूटाची रांगोळी साकाराली आहे. ही रांगोळी त्यांनी साईज बोर्डवर काढली आहे. या रांगोळीसाठी ८ ते १० किलो रांगोळी पावडर कलर वापरण्यात आले आहेत.महाजन यांना ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना ५ तास लागले. महाजन यांनी या रांगोळीतून शहीदांना श्रद्धांजली दिली असून ईश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो व त्यांच्या परिवाराला दुख पेलण्याची ताकद देवो हा संदेश दिला आहे. महाजन हे एम. डी. देढिया इंग्लिश हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुलगी वाचवा, अमिताभ बच्चन, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. कलाम, सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक रांगोळी साकारली आहेत.