शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

पालिकेच्या मोकळ्या जागांचा धंदा करणा-यांना होणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:44 PM

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा परस्पर व्यापारी वापरासाठी तसेच विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचे समोर आले आहे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा परस्पर व्यापारी वापरासाठी तसेच विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अश व्यक्तींना दंड ठोठावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.पालिकेने १९९७ मध्ये शहर विकास आराखडा अंमलात आणला. राज्य सरकारच्या मान्यतेने २००९ मध्ये त्यात काही फेरबदल करण्यात आले. या आराखड्यानुसार अनेक खाजगी जागांवर पालिकेने नागरी सुविधांसाठी आरक्षणे टाकली आहेत. काही खाजगी आरक्षित जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने तसेच जमिनीच्या वाढत्या दरामुळे मूळ मालकांनी अद्याप पालिकेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. काही आरक्षित जागा पालिकेच्या ठोस पाठपुराव्याअभावी पुन्हा मूळ खाजगी मालकांच्या ताब्यात गेल्या आहेत. मीरा रोड येथील कनाकिया परिसरातील टाऊन हॉलचे आरक्षण पुन्हा जागा मालकाच्या ताब्यात गेले आहे. त्यावरच नाट्यगृह साकारण्यात येणार होते. ते केवळ स्वप्नच राहिल्याने काशिमीरा परिसरात नाट्यगृहासाठी पर्यायी जागा शोधून त्यावर नाट्यगृह उभे करण्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. सामाजिक वनीकरण व उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भार्इंदर पूर्वेकडील आझादनगर या जागेवर बाळासाहेब ठाकरे कलादालन प्रस्तावित आहे. परंतु, ते आरक्षणही पूर्णपणे पालिकेच्या ताब्यात आले नसून त्यावर औद्योगिक अतिक्रमणे वसविण्यात आली आहेत. काही आरक्षित जागा मोकळ्या पडल्या असून मूळ मालकांकडून परस्पर त्याचा व्यापारी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यापोटी भरमसाठ भाडे वसूल केले जात आहे. काही खाजगी मोकळ्या जागा बक्कळ रक्कम वसूल करुन शाही विवाह सोहळ्यांसाठी भाडेतत्वावर दिल्या जातात. त्यासाठी अनेकदा पालिकेकडून परवानगी घेतली जात नसल्याचे उघड झाले असून या बडेजाव करणाºया विवाह सोहळ्यांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. तसेचआसपासच्या रहिवाशांनाही त्रास होत असताना स्थानिक प्रशासन व पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, पालिकेने आरक्षित केलेल्या जागा मूळ मालकांकडून परस्पर भाडेतत्वावर देण्यापासून रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत मांडण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर