ठाणे : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेकडो कोटी रुपये किमतीच्या मौजे कांबा, ता. कल्याण येथील शेतजमिनी लाल नोतनदास तनवाणी, गुणवंत भंगाळे आणि नरेश भाटिया यांनी प्रशासनाच्या पाठबळावर खरेदी केल्याच्या दावा केला जात आहे. मात्र, ते मूळ शेतकरी नसून त्यांनी शेतकरी असल्याचे बनावट दाखले जोडून प्रशासनाची फसवणूक करून आदिवासींच्या जमिनी हडप केल्याचा आरोप ठाणे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात विशाल मथुरा गुप्ता यांनी केला. यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
शेकडो कोटी किमतीच्या कांबा येथील आदिवासी शेतकºयांची जमीन सर्व्हे क्र. १२१/१, १२१/१/अ या जमिनी फेरफार क्र. ३३१२ द्वारे खरेदी केल्याचा दावा केला जात आहे. पण, आदिवासी शेतकºयांच्या जमिनींचा खरेदीविक्री व्यवहार होत नसतानाही तो या प्रकरणात झालेला दिसून येत आहे. आदिवासींच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन हा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. मात्र, या जमिनी खरेदी करणारेदेखील मूळ शेतकरी नसल्याची गंभीर बाब म्हारळपाडा, वरपगाव येथील गुप्ता यांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून देत या जमिनी शासनजमा करण्याची मागणी केली आहे. यामुळेसंबंधितांसह अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. या व्यवहारासंबंधी मौजे कांबा येथील जमीन सर्व्हे क्र. १५/७ या शेतजमिनीचा सातबारा उतारा फेरफार क्र. १२०१ नुसार कोहिनूर असोसिएट्सच्या नावे नोंद झालेला असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनात आणून दिले आहे. परंतु, हा फेरफार मंजूर करताना त्यात खरेदीदार लाल नोतनदास तनवाणी यांचा शेतकरी असल्याचा दाखला राजस्थानमधील शिवगंज येथील आहे. पण, तो दाखला नसून केवळ जमिनीचे प्रमाणपत्र असल्याची बाब जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली आहे.राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिले कारवाईचे आदेशया आदिवासींच्या शेतजमिनी बळकावल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल होऊनही अद्याप कारवाई झाली नसल्याची गंभीर दखल केंद्राच्या राष्टÑीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेऊन ३० दिवसांत कारवाई करण्याचे ५ डिसेंबर रोजी आदेशही पोलीस अधीक्षकांना जारी केले आहेत.तर, सर्व्हे क्र. ४७, १२१/१, १२०/१ आदी शेतजमिनीवर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाºयांनी दिले. तरीदेखील, त्यास न जुमानता बांधकाम सुरू असल्यामुळे आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात यासंदर्भात राज्यातील २८८ आमदारांना या अन्यायाविरोधात पत्रव्यवहार झाल्याचे गुप्ता यांनी निदर्शनात आणून दिले आहे.सोलापूर येथील बनावट दाखला जोडलाया ३३१२ क्रमांकाच्या फेरफारमधील नरेश भाटिया यांच्या नावे मौजे दापिवली, ता. अंबरनाथ येथील जमीन सर्व्हे क्र. २६/४, २६/५ या जमिनी सोलापूर येथील फेरफार क्र.४६९ नुसार नरेश भाटिया यांच्या नावे केल्या आहेत. परंतु, या ४६९ च्या फेरफारची जमीन मौजे गावटेवाडी ता. सोलापूर येथील सर्व्हे क्र. ४१/९ ची बाब निदर्शनात आणून दिली आहे.यानुसार, परहित चॅरिटेबल सोसायटीने रीतसर चौकशी केली असता गावटेवाडी येथील तलाठी यांच्या दप्तरी सर्व्हे क्र. ४१/९ चा सातबारा उतारा दिसून येत नसल्याने भाटिया याने खोटी कागदपत्रे जोडल्याची गंभीर बाब गुप्ता यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली आहे.यावर जिल्हाधिकारी आता काय निर्णय घेतात आणि आदिवासी शेतकºयांना काय न्याय देतात, याकडे या शेतकºयांसह आदिवासींच्या सामाजिक संघटना आशाळभूत नजरेने लक्ष ठेवून आहेत.