ठाणे : रक्षण आणि आदर केवळ बहीण आणि रक्षाबंधनपुरता मर्यादित न राहता आयुष्यातील प्रत्येक महिलेप्रति तो आदरभाव असावा, यासाठी पुरु षांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुरुषार्थ’ हा उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालयांत राबवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.२७ आॅगस्ट रोजी या उपक्र माचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, दिग्दर्शक विजू माने यांच्या उपस्थितीत होईल. रक्षाबंधन ते भाऊबीजेदरम्यान होणाऱ्या या उपक्रमात ५०० महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील पुरु ष विद्यार्थ्यांसमवेत पुरुषार्थाचा अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेणार आहेत.
रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ‘पुरुषार्थ’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:09 PM