शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मुख्यमंत्र्यांचा सेनेला धक्का, राष्ट्रवादीच्या खांद्यावर ठेवली बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:49 AM

नागरिकांचा विरोध असतानाही पारसिकनगरला सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने पार्किंगच्या आरक्षणात मलनि:सारण प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली होती.

अजित मांडकेठाणे : नागरिकांचा विरोध असतानाही पारसिकनगरला सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने पार्किंगच्या आरक्षणात मलनि:सारण प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली होती. राष्टÑवादीने यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून याला स्थगितीदेखील मिळवली होती. त्यानंतरही पालिकेने हे काम सुरूच ठेवले होते. परंतु, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास खात्याने या प्रकल्पाच्या फेरबदलाचा प्रस्तावच नामंजूर करून सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाच्या अभद्र युतीला धक्का दिला आहे. आरक्षणाचे फेरबदल नामंजूर केल्यामुळे अर्ध्याहून अधिक झालेले या प्रकल्पाचे काम थांबण्याची चिन्हे आहेत.कळव्यातील पारसिकनगर येथे ठाणे महापालिका मलनि:सारण प्रकल्प उभारत असून त्याचे कामही सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झाले आहे. मात्र, हा प्रकल्प भर वस्तीमध्ये होत असल्याने आरोग्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला सुरु वातीपासून स्थानिक रहिवाशांचा विरोध होता. यासाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील केली.पार्किंगचे आरक्षण असताना त्या ठिकाणी मलनि:सारणाचा प्रकल्प कसा उभा राहू शकतो, असा आक्षेप घेऊन राष्टÑवादीने याविरोधात आवाज उठवला. आरक्षण फेरबदल न करताच या कामाच्या निविदा काढल्याचा मुद्दाही लावून धरला. या कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणीही केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून हे काम थांबवण्याची मागणी केली होती.या कामावर २६ कोटींचा खर्च होणार होता हा प्रकल्प रहिवासी भागातून स्थलांतरित करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्याची चौकशी लावली होती. तरीही प्रकल्पाचे काम सुरूच होते. आता शासनानेच हा प्रकल्प जवळजवळ रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.पारसिकनगर येथील ९४०० चौरस मीटर जागेवरील पार्किंगच्या जागेवरील आरक्षणात फेरबदल करून त्या जागी अर्धे पार्किंग आणि मलनि:सारणाचे आरक्षण, असा फेरबदलाचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. शासनाकडे नियमानुसार तो एक वर्षाच्या आत पाठवणे अभिप्रेत होते. परंतु, पालिकेने वर्षभरात तो तसा अहवाल शासनाकडे पाठवलाच नसल्याचा ठपका नगर विकास विभागाने ठेवला आहे. त्यानुसार, फेरबदलाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्यानेच हा फेरबदल प्रस्ताव नामंजूर करण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. एकूणच नागरिकांचा विरोध असताना आणि मुख्यमंत्र्यांनीदेखील या प्रकल्पाला स्थगिती दिली असताना केवळ सत्ताधाºयांनी आणि पालिकेच्या अभद्र युतीच्या जोरावर या प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले होते. अखेर, पालिकेच्या चुकीमुळे आता या प्रकल्पाचे काम थांबवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपानेच आता या अभद्र युतीला धक्का देऊन पालिकेचा फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकल्पाचे काम सुरू ठेवते की बंद करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस