शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर हृदयस्पर्शी 'निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना ठेवले खिळवून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 4:43 PM

निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना अभिनय कट्ट्यावर खिळवून ठेवले. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर हृदयस्पर्शी 'निशब्द रात्र'एकांकिकेने प्रेक्षकांना ठेवले खिळवून प्रत्येक एकांकिका तिची वेगळी छाप सोडून जाते हा इतिहास आहे : किरण नाकती

ठाणे : 'निशब्द रात्र'....माणसाची जिंदगानी म्हणजे जन्म ते मरण ह्या दोन स्टेशनामधील एक प्रवास कधी गाडी चालते कधी थांबते कित्येक अपघात कधी सुखाची वाट पण चालत राहायचं जगत राहायचं हा नियम जगण्याचा.पण कधी कधी जगण्याचे अर्थ विस्कटून जातात नात्यांमधली वीण उसवते सार सार व्यर्थ भासू लागत आणि दिशाहीन दिवसानंतर उरते आयुष्यात ती एक 'निशब्द रात्र'.  अशाच एका रात्रीची गोष्ट अभिनय कट्टा क्रमांक ४२० सादर एकांकिका 'निशब्द रात्र'.

       एका सत्यघटनेवर आधारित कदिर शेख ह्यांच्या संकल्पनेवर आधारित ही निशब्द रात्र.माथाडी कामगारांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी गरिबी भूक अशा अभिशाप लाभलेल्या माणसाच्या जगण्यातील पैशाच अस्तित्व म्हणजे कदिर शेख दिग्दर्शित एकांकिका 'निशब्द रात्र'.भुकेन व्याकुळ मुलांच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या आईची गोष्ट ..भुकेसमोर नाईलाज म्हणून मुलाला बळी देऊन पुढील जगण्याचा दिवस ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या बापाची गोष्ट.. चांगल्या वाईट अनुभवातून जगन जाणलेल्या एक खाटीकाची गोष्ट.. आयुष्याचा अर्थ हव्यास आणि फक्त मौज आशा निष्ठुर मुकादमाची गोष्ट... म्हणजे निशब्द रात्र.  उत्तम अभिनय,साजेशी प्रकाशयोजना साजेसं पार्श्वसंगीत आणि कथानकाला चित्रित करणारा साजेसं नेपथ्य आणि त्याला अनुभवी दिग्दर्शनाची जोड ह्यातून निर्माण झालेल नाट्यमय सादरीकरण म्हणजे 'निशब्द रात्र'. सदर एकांकिकेत भिवाची भूमिका आदित्य नाकती शेवंतांची भूमिका न्यूतन लंके सुलेमान चाचा ची भूमिका अजित भोसले आणि मुकादमची भूमिका सहदेव कोळंबकर ह्यांनी साकारली.सादर एकांकिकेचे पार्श्वसंगीत परेश दळवी, प्रकाशयोजना विजया साळुंके ह्यांनी सांभाळले.सदर एकांकिकेचे नेपथ्य शनी जाधव,सहदेव साळकर आणि परेश दळवी ह्यांनी उभारले. एकांकिका खरोखरच मनाला भिडली.माथाडी कामगारांचा जीवन वास्तवरूपी साकारण्यात आलेलं.आई मुलाचं नात, नवरा बायकोच नात, माणसाचं माणसाशी असलेलं माणूसकीच नात खूप सुंदर रित्या एकांकिकेत मांडल होत.प्रत्येकाचा अभिनय,प्रकाशयोजना,संगीत,नेपथ्य ह्याच्या सोबतीने 'निशब्द रात्र' ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली.असे मत उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केले. अभिनय कट्ट्यावर अनेक एकांकिका सादर झाल्यात प्रत्येक एकांकिका तिची वेगळी छाप सोडून जाते हा इतिहास आहे. प्रत्येक कलाकृती उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन करून जाते. हे सर्व रसिकहो फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे.आजची एकांकिकाही अभिनय, प्रकाश,संगीत, आणि नेपथ्याच्या जोरावर वेगळी छाप सोडून गेली.विक्रमी ४२० कट्ट्याच्या प्रवासात दर रविवारी अभिनय कट्ट्यावर, दर गुरुवारी वाचक कट्ट्यावर आणि दर शुक्रवारी संगीत कट्ट्यावर कलाकार वेगवेगळे सादरीकरण करत रसिकांचे मनोरंजन करत आहेत आणि करत राहणार. ही ताकद तुमच्याच आशीर्वादामुळे म्हणून तुमची कौतुकाची आणि आशीर्वादाची साथ सदैव राहूदे असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले. सदर एकांकिकेचे निवेदन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक