शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठीतील दर्जेदार साहित्य निघाले लंडनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:00 AM

‘ग्रंथ तुमच्या दारी’ : १५ ग्रंथपेट्या झाल्या रवाना; कुसुमाग्रज प्रतिष्ठान, इल्फर्ड मंडळाचा पुढाकार

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : जगाच्या कानाकोपऱ्यांत मराठी माणूस वास्तव्याला आहे. देशापासून दूर राहत असले, तरी मातृभाषेविषयी त्यांची गोडी कायम आहे. मराठीतील नव्याजुन्या साहित्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता असते. अशा वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि इल्फर्ड मित्र मंडळाने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी मराठी साहित्याच्या १३ ग्रंथपेट्या मोठ्यांसाठी, तर बालसाहित्याच्या दोन पेट्या लंडनला रवाना झाल्या.जगभरात वाचनाचा प्रचार आणि प्रसार करत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानद्वारे जगातील कानाकोपऱ्यांत मराठी साहित्याचे मंथन होत असलेल्या या उपक्रमात सध्या तब्बल दोन कोटींची ग्रंथसंपदा असलेल्या १६६१ ग्रंथपेट्या आहेत. आता १५ ग्रंथपेट्या इल्फर्ड मित्र मंडळाच्या सागर डुगरेकर यांच्या पुढाकाराने लंडनमध्ये रवाना झाल्या आहेत. या गं्रथपेट्यांमध्ये दर्जेदार विविध विषयांवरील २५ पुस्तकांची एक पेटी आहे, ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके आहेत. साहित्याचे, लेखनशैलीचे जास्तीतजास्त प्रकार जसे कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, चरित्र, प्रवासवर्णन अशा साहित्याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत एका वाचक कुटुंबाक डे ग्रंथपेटी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे.

प्रत्येक ग्रंथपेटीतील पुस्तके वेगवेगळी असणार आहेत. दर तीन महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथपेटी इतर गटांसोबत बदलली जाते. जगभरात जिथे म्हणून मराठी शब्द, मराठी भाषा आहे, मराठी माणूस आहे, तिथे आमची योजना जावी, असा आमचा प्रयत्न आहे. एका छोट्याशा कल्पनेला जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्याचाच एक भाग म्हणून तब्बल १५ ग्रंथपेट्या लंडनला रवाना झाल्या आहेत. लवकरच इतर काही देशांतही या पेट्या पाठवणार आहोत, असे ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे समन्वयक विनायक रानडे यांनी सांगितले.
योजनेंतर्गत वाचनालयाच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकखरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी द्यावी, असे आवाहन केले जाते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवस, एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगांनुरूप ग्रंथसंपदा मिळत गेली. या गं्रथसंपदेला भारतात ८० जीअंतर्गत आयकरात सूट देण्यात आली आहे. या योजनेमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात, कार्यालयात, दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी ग्रंथसंपदा विनामोबदला विनासायास उपलब्ध करून दिल्या जातात.या ठिकाणीही पोहोचणार योजना : ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक येथे, तर भारताबाहेर दुबई, नेदरलॅण्ड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, ओमान, मॉरिशस, सिंगापूर, लंडन, इत्यादी ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यLondonलंडन