शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

रस्त्यावर फटाके फोडण्या वरून भाईंदर मध्ये दोन गटात राडा ; ५ जणांना अटक

By धीरज परब | Published: October 31, 2024 10:47 PM

अल्पवयीन असलेल्या यश याच्या फिर्यादी वरून तिघा जणांनी मारहाण , शिवीगाळ केली . लाकडी टेबल मारले . तसेच बर्फ तोडण्याच्या तीक्ष्ण हत्याराने वार केले.

मीरारोड - वर्दळीच्या रस्त्यावर फटाके फोडण्या वरून दोन गटात झालेल्या राड्या नंतर पोलिसांनी  ५ जणांना अटक केली आहे . भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी दीपक दास , सामंता बाघ व यश बाघ हे फटाके फोडत होते . त्यावेळी रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या एकाने रस्त्यावर बॉम्ब का फोडता असे बोलत शिवीगाळ केली . त्यावरून त्यांच्यात वाद झाला . 

अल्पवयीन असलेल्या यश याच्या फिर्यादी वरून तिघा जणांनी मारहाण , शिवीगाळ केली . लाकडी टेबल मारले . तसेच बर्फ तोडण्याच्या तीक्ष्ण हत्याराने वार केले . पोलिसांनी तिघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून आबिद व साबीद रा . क्रिस्टक्राऊन , आझाद नगर ह्या दोघा भावांना अटक केली आहे . 

तर आबिद याच्या फिर्यादी वरून ,  ते नागोरी हॉटेल येथून जात असताना हे तीन मुले रस्त्यात बॉम्ब फोडत असल्याने त्यांना रस्त्यात बॉम्ब फोडू नका असे सांगितले असता बाचाबाची झाली . त्याच्या दुकानासमोर २५ - ३० जण जमले . त्यातील ३ - ४ जणांनी मिळून आबिद सह सादिक व सादिक , साबीद ह्या भावना शिवीगाळ , दमदाटी करत मारहाण केली . एकाने साबीद च्या डोक्यात लोखंडी रॉड मारला . 

पोलिसांनी आबिद च्या फिर्यादी नुसार यश घनश्याम बाघ रा . जेसलपार्क ; सामंता बाघ , दीपक दास व रॉबिन तांडी तिघेही रा . हरिश्चंद्र नगर ह्या चौघांवर गुन्हा दाखल करत सामंता , दीपक आणि रॉबिन ह्या तिघांना अटक केली आहे . २८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत . 

सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी फटाके विक्री आणि फोडण्यास मनाई आहे . रहदारीच्या ठिकाणी फटाके फोडून वा फटका स्टॉल लावून येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांच्या जीवितास तसेच मालमत्तेस हानी होण्याची भीती असून देखील  सर्रास फटाके फोडले जात असल्याचे व मोठ्या साठ्याने विक्री स्टॉल लावल्या बद्दल जागरूक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे .