शौकत शेख
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खानवेल मार्गे दमण दारू महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात आणली जाते. सरत्या वर्षाची अखेर व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टिफर्स्टच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पार्ट्यांसाठी या दारूचा वापर सर्रास होत असतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी यावर करडी नजर ठेवली आहे.
मुंबई, गुजरात आणि शहरी भागातून कळंब, अर्नाळा, केळवे, डहाणू, बोर्डी येथील समुद्र किनारे तसेच मोकळ्या वाड्या, रिसॉर्ट आणि हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात दमण आणि बेकायदेशीर दारूचा महापूर वाहात असतो. थर्टीफर्स्ट साजरा करणाºया तळीरामांच्या पार्ट्यांसाठी येणाºया दमण दारूच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या मार्गावर आणि साठ्यावर राज्य उत्पादन खात्याने पाळत ठेवली असून ठिकठिकाणी गस्त घालण्यात आली आहे.
मागील १५ दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड आणि इतर तालुक्यांतील वेगवेगळ्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत लाखोचा मद्यसाठा जप्त केला आहे. सोमवारी वाणगाव येथे विदेशी दारु साठा जप्त करण्यात आला आहे. डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३१ डिसेंबर रोजी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात, डहाणू बीच तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट नाकाबंदी, बीट मार्शल पेट्रोलिंग्चाही वापर करण्यात येणार आहे.किंमत पंचवीस हजारपर्यंतच् वसई तालुक्यातील वालीव येथे सदर टोळी महाराष्ट्रातील ब्लेंडर्स, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज ही कमी किमतीची दारू विदेशी रेड लेबल, ब्लॅक लेबल अशा उच्च प्रतीच्या लेबल असलेल्या बाटल्यांमध्ये भरून तब्बल चार हजार ते पंचवीस हजारपर्यंत किमतीला अवैधरीत्या विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.च्राज्य उत्पादन शुल्क विभागाने वसई तालुक्यातील वालीव येथे धाड टाकत हलक्या प्रतीचे मद्य तसेच विदेशी रिकाम्या बाटल्या असा जवळपास ७ ते ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपींना शासन परवानगी असलेल्या दुकानातूनच खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.च्३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वाहतूक शाखेकडून देखील विविध ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच चौकाचौकात बॅरिकेटस्चा वापर करण्यात येणार असून दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांची नाकेबंदी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.दुय्यम दारू उच्च प्रतीची म्हणून विकणाºया टोळीतील एकाला अटकपालघर : दुय्यम प्रतीची दारू उच्च प्रतीच्या (स्कॉच) बाटलीत भरून विक्री करणाºया टोळीपैकी एकास अटक करण्यात पालघर राज्य उत्पादन विभागास यश आले आहे. अन्य आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. या प्रकरणात पालघर, ठाणे जिल्ह्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशयही अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.