मीरारोड - थर्टी फस्टसाठी आॅर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांना बेकायदा नाचवुन त्यांच्या प्रतिष्ठेस हानी पोहचवली म्हणुन पोलीसांनी बारचा मालक - चालक सह एकुण ११ जणां विरुध्द गुन्हा दाखल केलाय. भार्इंदर भाजपाचा नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती गणेश शेट्टी हा बारचा मालक आहे. तर काशिमीरा भागात आॅर्केस्ट्रा बार मध्ये नृत्य करुन अश्लील हावभाव प्रकरणी ११ बारबालां सह दोघा बार कर्मचारयां वर गुन्हा दाखल झालाय.आॅर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास बारबालांना नाचवण्यासह अनैतिक प्रकार घडत असताना थर्टी फस्टच्या रात्री देखील पोलीसांनी दोन बार वर कारवाई केली. अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम यांनी काशिमीरयाच्या सरोजा लॉज जवळील ब्लु नाईट आॅर्कस्ट्रा बार वर धाड टाकली असता आत मध्ये तब्बल ११ बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करताना आढळुन आल्या. पोलीसांनी ११ बारबालां सह बारचा व्यवस्थापक व खजिनदार अशा 22 जणांना अटक केली.तर भाईंदर पुर्वेच्या अण्णा पॅलेस या आॅर्केस्ट्रा बार वर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर यांनी पोलीस पथकासह धाड टाकली असता तेथे ४ बारबाला नृत्य करताना आढळुन आल्या. आॅर्केस्ट्रा बार मध्ये केवळ गाण्याची परवानगी असताना या चौघाही तरुणींना नाचवले जात होते.या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम २०१६ नुसारबारच्या चालक व मालका सह एकुण ११ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पैकी बारचा व्यवस्थापक, खजिनदार, वेटर आदी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.सदर बारचा मालक गणेश शेट्टी असुन त्याच्या सह चालका वर गुन्हा दाखल होऊन दोघांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगीतले. उपनिरीक्षक विजय टक्के पुढिल तपास करत आहेत.गणेश शेट्टी हा आॅगस्ट मध्ये पालिका निवडणुकीत भाजपाचा नगरसेवक म्हणुन नवघर मार्ग भागातुन निवडुन आला असुन पालिकेच्या प्रभाग समितीचा सभापती देखील आहे. शेट्टी विरोधात या आधी देखील वेश्याव्यवसाय प्रकरणी पीटा कायद्या खाली गुन्हा दाखल आहे.विरोधात अध्यक्ष ब्लयु नाईट
भार्इंदर व काशिमीरयात आॅर्केस्ट्रा बार वर धाडी ; ११ बारबालांसह 22 जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:31 PM