सदानंद नाईक, उल्हासनगर : मध्यवर्ती व हिललाईन पोलिसांनी मटका, गुडगुडी, सोराट, कल्याण मटका, मांगपत्ता जुगार अड्ड्यावर मंगळवारी धाडी टाकून २२ जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.
उल्हासनगरच्या चौकाचौकात व गर्दीच्या ठिकाणी मटका जुगार, कल्याण मटका, मांगपत्ता आदी जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू असल्याची टीका होत आहे. मध्यवर्ती पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजता जीरा चौक येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून मटका, गुडगुडी व सोराट जुगार खेळणाऱ्या गुरुमुख हिरदास उदासी, सागर बबन भोरे, विलास कुष्णा बोरकर, अरविंद अजितसिंग लभाना, दीपक सुभाष खैरे, पुंडलिक आनंद वाघमारे, आकाश रवींद्र जाधव, अनिल रॉबिन कांबळे, अनिलसिंग दर्शनसिंग लभाना, निखिल रवी सोंडे, संतोष राजाराम गरुड व गुड्डू लालबहादूर रॉय या १२ जणांवर पोलिसानी गुन्हा दाखल केला. तर हिललाईन पोलिसांनी जयजनता कॉलनीतील मटका जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री धाड टाकून कुंदन भालचंद्र मढवी व महेर उदय झडयाळ या दोघांना अटक केली.
मध्यवर्ती पोलिसांनी मंगळवारी १७ सेक्शन, वर्षा बार जवळील गल्लीतील मांगपत्ता जुगार अड्ड्यावर सायंकाळी साडे पाच वाजता धाड टाकली. सुनील गणेश मोतीया, सुनील अशोकलाल होतचंदानी, गिरीष श्यामलाल कुकरेजा, चंद्रकांत दामू नाईक, मनोज गुल्लू बाराते, सनी प्रदीप तखलानी, रमेश सुदामा कुकरेजा, मितेश सतिशचंद्र जोशी, निवान हरेश गोगिया व जितू वासवानी या १० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी मोठ्या मटका जुगार अड्ड्यावर धाडी टाकून मटका जुगार अड्डा चालकांच्या मनात धडकी भरली आहे. अशीच कारवाई सुरू ठेवण्याचा मानस पोलिसांनी व्यक्त केला आहे.