शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

बदलापूरमध्ये सहा तासापासून रेल रोको सुरूच; संतप्त आंदोलकांचा माघार घेण्यास नकार

By पंकज पाटील | Published: August 20, 2024 3:49 PM

Badlapur Rail Roko News: बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणातील आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. गेल्या सहा तासापासून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको सुरूच ठेवले आहे.

- पंकज पाटील बदलापूर -  बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणातील आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. गेल्या सहा तासापासून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको सुरूच ठेवले आहे. अनेक विनवण्या करून देखील आंदोलक माघार घेण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी अट आंदोलन कर्त्यांनी टाकली आहे.

बदलापुरात चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडली होती. त्यानंतर बदलापूर संतप्त वातावरण पसरले आहे. आज सकाळी सात वाजता बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयाच्या परिसरात पालकांनी ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी उस्फूर्तपणे बदलापूरकर नागरिक देखील सहभागी झाले होते. हे आंदोलन 10 वाजेपर्यंत सुरू असताना अचानक या संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको करून गेल्या सहा तासापासून रेल्वे सेवा ठप्प करून ठेवली आहे. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनामार्फत सुरू होता. मात्र आंदोलक आरोपीला फाशी देण्याच्या मुद्द्यावर कायम राहिल्याने पोलीस प्रशासन आणि आंदोलन यांच्यामध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही.

रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी देखील आंदोलकांसोबत अनेक वेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक 'फाशी द्या, फाशी द्या' या आपल्या घोषणांवरच कायम राहिले. त्यानंतर उल्हासनगरचे डीसीपी सुधाकर पाठारे यांनी देखील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात देखील त्यांना अपयश आले. सहा तास रेल्वे सेवार्थ करून प्रवाशांनी आपल्या मागण्यांवर कायम राहण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :badlapurबदलापूरMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे