ठाणे : रेल्वेचेच कर्मचारी आपले नियम कसे धाब्यावर बसवतात त्याचे उदाहरण बुधवारी धडधडीतपणे समोर आले. रेल्वेत सिगारेट, विडी ओढण्यास सक्त मनाई असतानाही रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये बिनधास्त पत्ते खेळत सिगारेट ओढताना आढळून आले.रेल्वेत धुम्रपानास सक्त मनाई आहे. त्यांचा कायदा अधिक कठोर आहे. तेथे गाडीत सोडाच पण प्लॅटफार्मवरदेखील सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सर्वत्र नजर ठेवून असतात. यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात विडी, सिगारेट ओढणारे आढळून येत नाहीत. त्यांची विक्रीही बंद आहे.लोकल प्रवासाचे सर्व नियम रेल्वे कर्मचारीच धाब्यावर बसवत असल्याचे या घटनेने उघड झाले. रेल्वे कर्मचाºयांसाठी मुंबईहून आलेल्या रेल्वे कर्मचारी स्पेशल लोकलच्या प्रथम श्रेणी डब्बा (बोगी) क्र मांक ११७७ ए मधून बरेच अधिकारी व कर्मचारी बुधवारी प्रवास करीत होते. बोगीतील दोन-तीन सीटवर काही कर्मचारी घोळक्याने बसून पत्ते खेळत होते. पत्ते खेळण्याच्या मनाईलाही न जुमानता त्यांचे खेळणे सुरू होते. या स्लो लोकलच्या बोगीतील कल्याणकडील शेवटच्या सीटवरील घोळक्यातील एकाने तर सिगारेट पेटवून ती गाडीतच ओढली. सिगारेट तोंडात ठेवून तो बिनधास्त खेळतही होता. हा सर्व प्रकार लोकमतच्या प्रतिनिधीने कॅमेºयामध्ये कैद केला.आग लागण्याच्या घटना घडू नये, यासाठी सतर्क राहणारे रेल्वे प्रशासनाचेच कर्मचारी मनमानी करून संकटाला ओढावून घेत असल्याची ही घटना समोर आली आहे. रेल्वे कर्मचाºयांसाठी असलेल्या या लोकलचे शेवटचे स्टेशन कल्याण आहे. पण या दरम्यानच्या प्रवासात कर्मचारी घोळक्याने एकत्र बसून पत्ते खेळण्यासह अनेक नियमांची पायमल्ली करीत असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी लागू असलेले नियम रेल्वेच्या कर्मचाºयांसाठी लागू नाहीत का, की त्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे कर्मचारीच ओढतात लोकलमध्ये सिगारेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 6:14 AM