शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

पाऊस, रामभक्तीला आले उधाण, लक्षणीय ठरला बुधवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 1:40 AM

बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला.

गेले काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाला सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून बुधवारी दिवसभर मुसळधार सरींनी ठाणे जिल्ह्याला झोपडून काढले. बुधवारी सायंकाळपासून सोसाट्याचे वारे व कोसळधारांनी तुफान धुमाकूळ घातला. पावसामुळे अनेक झाडे कोसळली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी सायंकाळी झालेल्या तुफान वृष्टीने रेल्वे वाहतूक कोलमडल्याने अत्यावश्यक सेवेकरिता मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांच्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला होता.

बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला. अनेक मंदिरांमध्ये सकाळपासून रामरक्षा, हनुमानचालिसा पठण करण्यात आले. चौकाचौकांत श्रीरामाच्या तसबिरीचे पूजन करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही ठिकाणी बाइकरॅली काढण्यात आल्या. अनेकांनी कोरोनाच्या संकटामुळे घरातच पूजाअर्चा करुन राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला.ठाण्यात मोठी पडझडलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्याला मंगळवारी रात्रभर झोडपले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६६.८ मिमी पाऊस पडला. यादरम्यान ठाणे शहरात १६ झाडे उन्मळून पडली. एका इमारतीची गॅलरी कोसळली, तर कसारा घाटात दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.टोकावडेपासून दोन किलोमीटर अंतरावरील हेदवली गावच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. माळशेज घाटातील वळणावर मोटारसायकलची ट्रकला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. कसारा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने रस्त्यावर मातीचे ढिगारे असून, झाडेही कोसळली आहेत. यातून वाट काढत वाहने पुढे जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.ठाणे शहरात घोडबंदर रोडवरील ओवळा येथे श्रीराम हॉस्पिटलच्या कम्पाऊंडची भिंत एका घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. शहरात १६ पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. घोडबंदर रोडवरील पाटोनपाडा येथील सोसायटीतील आठ दुचाकींवर एक झाड पडले. कळवा येथील मनिषानगरसह शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक ९३ मिमी पाऊस पडला. या खालोखाल भिवंडीला ९0 मिमी, कल्याणला ३५, मुरबाडला ७0, शहापूरला ३४, उल्हासनगर ४४ आणि अंबरनाथला ७0 मिमी पाऊस पडला. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात अवघा ८८ मिमी आणि बारवी धरण क्षेत्रात ९३ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.नाल्यात बुडून एकाचा मृत्यूमीरा रोड : मीरा गावठाणमधील गायत्री सोसायटीत राहणारे राकेश हरसोरा (४७) यांचा बुधवारी नाल्यात बुडून मृत्यू झाला. तर वाहून जाणाºया एकाला स्थानिकांनी वाचवले.मीरा गावठाण - महाजनवाडीत डोंगरावरून पाण्याचा मोठा लोंढा येतो. गेले दोन दिवस पडणाºया मुसळधार पावसामुळे मोठ्या नाल्याची भिंत कोसळली व रस्ता खचला. येथील बैठ्या चाळींमध्ये पाणी शिरले आहे. सकाळी दोन रिक्षा आणि दुचाकी नाल्यात वाहून गेल्या. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात राकेश नाल्यात वाहून गेले. त्यांचा मृतदेह पुढच्या भागात आढळला. वाहून जाणाºया एकास रहिवाशांनी वाचवले.रामनामाचा जल्लोष, दीपोत्सव, फटाक्यांची आतषबाजीकल्याण-डोंबिवलीत घरोघरी उत्साह : बाइक रॅली, प्रतिमा पूजनडोंबिवली : अयोध्येत रामजन्मभूमीच्या भूूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. त्यास कोरोनामुळे अनेकांना हजर राहता न आल्याने शहरातील कारसेवकांनी तसेच रामभक्तांनी रामनामाचा जयघोष करीत घरोघरी रामाच्या प्रतिमेचे पूजन केले. युवकांनी बाइक रॅली काढली, तर भाजपच्या वतीने चौकामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. ठाकुर्लीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.बुधवारी सकाळी पावसाचा जोर अधिक असल्याने रामभक्तांनी घरी राहून प्रतिमा पूजन केले. संध्याकाळी दीपोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील श्री गणेश मंदिर संस्थान, श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर आदी ठिकाणी राम दरबाराच्या मूर्तींना फुलांनी सजवण्यात आले होते. नागरिकांनी मंगलवेश परिधान करून या सोहळ्याचा आनंद लुटला. गणेश मंदिराला आकर्षक सजावट केली होती. त्या ठिकाणी तीन दिवसांपासून वाल्मिकी रामायणाचे पठण करण्यात आले. सव्वा कोटी रामनाम जपाचा संकल्पही सोडण्यात आला होता.संध्याकाळी दीपोत्सवाचे नियोजन केले होते. रामनामजप, पठणासाठी काही जोडप्यांना बोलावून त्यांना फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करुन हा उपक्रम पार पडल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली. एकतानगर येथे भाजपचे पदाधिकारी बाळा पवार यांच्या घरापासून बजरंग दल, संघ स्वयंसेवकांनी बाइक रॅली काढली होती. त्यावेळी रामाचा, हनुमानाचा जयघोष करण्यात आला. ठाकुर्लीतही काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला. अनेक कारसेवकांनी घरी रांगोळी काढली, काहींनी कारसेवेला गेले असताना सोबत आणलेल्या जन्मस्थानाच्या ठिकाणच्या दगडाची श्रद्धेने पूजा केली. संघ स्वयंसेवक आणि डोंबिवली इतिहास संकलन समितीचे चंद्रकांत जोशी यांच्या तुकारामनगर, आयरे गाव येथील घरामध्ये त्यांनी पाषाण पूजन केले. सोसायटीसह अन्य स्वयंसवेकांनी जाऊन त्याचे दर्शन घेतले. कल्याणमध्येही साठे बंधू यांच्या घरी राममंदिर सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तेथे २८ सप्टेंबर १९९० रोजी श्रीराम रथयात्रेच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी कल्याणमध्ये आले असता, त्यांना देण्यात आलेली तलवार अजूनही जपून ठेवण्यात आली आहे. त्याचे पूजन करण्यात आले.रामनगरच्या श्रीराम मंदिरामध्ये रामदरबाराचे पूजन करून अभिषेक संपन्न झाला. कोरोनापासून देशाच्या संकटाचे रक्षण करावे, असा संकल्प सोडण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने रामभक्तांनी घरोघरी जप केला आणि विश्वशांतीची प्रार्थना केली. 

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरारRainपाऊस