शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 2:24 AM

ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे १३ लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.भाताच्या ४२ हजार हेक्टरसह नागलीचे १२७ हेक्टर आणि वरी पिकाचे ३७ हेक्टर आदी ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रूपयांची भरपाई आली आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणात या रकमेचे वाटपही जिल्ह्यात सुरू आहे. पण फळबागांच्या नुकसानीचीदेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. कल्याण तालुक्यात ८.७२ हेक्टरवरील फळबागा आणि अंबरनाथ तालुक्यातील १५.४५ हेक्टर आदी २४ हेक्टरपेक्षा जास्त फळबागांच्या नुकसानीचा फटका शेतकºयांना बसला आहे. त्यांचीदेखील नुकसान भरपाई शेतकºयाना मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात शेतक-यांचे मेळावेठाणे : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. या संकटावर मात करण्यासाठी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाव्दारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत गावोगावी कृषी मेळावे घेवून भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कल्याण येथील बापसई येथील मेळाव्यात कलापथकाच्या माध्यमातून शेतकºयांना रब्बीचे महत्त्व पटवून दिले आहे. बापसईचा शेतकरी मेळावा जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेभे, कल्याण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कोसबड हिल कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ, सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी भात पीक व भाजीपाला व इतर सर्व पिकाची लागवड, उत्पन्न, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना व पिकाच्या माहितीची घडी पत्रिका वाटप करण्यात आली. एमएसआरएलएम हिरकणी योजनेव्दारे सहा बचत गटांना ५२ हजार ५०० रूपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील अन्य गावखे्यांमध्येही रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या मेळाव्यांमध्ये, गावसभेत शेतकºयांना हरबरा, वाल, मूग आणि इतर कडधान्य लागवडीची माहिती दिली जात आहे. भाजीपाला पिके, कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन, बीजप्रक्रिया, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात येत आहे. बंधारे बांधकामात पुढाकार घेणाºया गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भाजीपाला या पिकाखाली येईल यादृष्टीनेही नियोजन सुरू असल्याचे ढगे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे