बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर रविवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता. पाऊस पडतांना वीजा देखील चमकत होत्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ व बदलापूरकरांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र अवकाळी पाऊस असल्याने पुन्हा उकाडा वाढू शकतो अशी भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान अंबरनाथ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान पावसाच्या सरी आल्याने रॅलीतील नागरिक विखुरले जातील अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र पावसाच्या सरी सह आंबेडकरी जनतेने देखील जयंतीचा आनंद लुटला. पावसात भिजतच संपूर्ण मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली.
अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 8:48 PM