शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

ठाण्यात पावसाची कोसळधार, १४८. ५७ मिमी पावसाची नोंद; २० हून अधिक सखल भागात साचले पाणी

By अजित मांडके | Published: June 28, 2023 6:11 PM

ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात मंगळवारी सांयकाळ पासून जोर धरलेल्या पावसाने बुधवारी देखील दमदार हजेरी लावली. परंतु या जोरदार झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या नालेसफाई आणि गटार सफाईची पुर्ती पोलखोल केल्याचे दिसून आले. शहरातील २० हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यातही सकाळच्या पहिल्या पाच तासातच ठाण्यात १०५ मीमी पावसाची नोंद झाली. तर सांयकाळ पर्यंत शहरात १४८.५७ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक सखल भागात पाणी साचले होते. कळवा, मुंब्रा, घोडबंदर, दिवा भागातही अनेक ठिकाणी दुकानात घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणची बत्ती ही गुल झाली होती. याशिवाय शहरातील झाड आणि त्याच्या फांदया तुटून पडल्या. याचबरोबर सुरक्षा भिंत ही एका ठिकाणी कोसळली आहे. या घटनांमध्ये सुमारे ०५ वाहनांचे नुकसान झाले मात्र कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

 बुधवारी सकाळपासून ८.३० वाजल्यानंतर पावसाने सुरुवात केली. पहिल्या तीन तासात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने ४९.८१ मिमी नोंद झाली. त्यानंतर दोन तास पाऊस सुरू होता. मात्र साडेबारा ते दीडच्या दरम्यान आणखी रुद्र रुषधारण केल्याने अवघ्या एक तासात  ४३.१८ मिमी नोंदवला गेला. याशिवाय प्रकारे दुपारी दीड वाजेपर्यंत १०५.१६ मिमी झाल्याची नोंद ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षेत झालेली आहे. या पाच तासांच्या पावसाने ठाणे शहराला चांगले वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या बाजूच्या गटारातील पाणी चक्क रस्त्यावर आल्याने शहराला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सुमारास तारेवरची कसरत करून चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर शहरात झाडांसह सुरक्षा भिंत आणि दरड कोसळल्याची घटना समोर आली.

 या ठिकाणी साचले पाणी ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमा परिसर, खारकर आळी परिसर, जांभळी नाका परिसर, कॅसरमिल, कळवा पूर्व, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट या ठिकाणी सखल २० भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले आहे.या भागात वृक्ष पडलेया मुसळधार पावसामुळे वागळे इस्टेट, कळवा येथील गणपती पाडा, खोपट, मासुंदा तलाव याभागात वृक्ष उन्मळून पडले. तर कोपरी, सर्व्हिस रो लुईसवाडी याठिकाणी झाडाच्या फांद्या गळून पडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

वृंदावन भागात पाणीच पाणीवृदांवन भागातील इमारतींच्या परिसरात पाणी साचू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मागील वर्षी काही उपाय करण्यात आले होते. परंतु यंदाच्या पावसाने त्यांचे हे उपाय फोल ठरविल्याचे दिसून आले. वृदांवन भागातील अनेक इमारतींच्या ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.कळव्यात तलावातील पाणी बाहेरकळव्यातील नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे कळव्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र अशातच ठाण्यातील कळवा पूर्व परिसरात चक्क तलावाचे पाणी बाहेर आले. त्यासोबतच तलावातील मासे व कासव देखील आता रस्त्यावर दिसून आले.

टॅग्स :Rainपाऊस