शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

By जितेंद्र कालेकर | Published: October 08, 2023 2:07 PM

युतीने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले?: टोलवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

ठाणे - टोल बंद करण्यासाठी मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६७ टोल नाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते,  त्याचे काय झाले, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. टोलवाढी संदर्भात येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाहीतर मात्र गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. त्याबाबतची  भूमिका लवकरच जाहीर करणार आल्याचे राज ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

टोलदरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या चार दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवरील मुलूंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. रविवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन अविनाश जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ठाण्यातील उपोषणाची माहिती घेतल्यानंतर उपोषण हे आपले काम नसल्याचे अविनाश जाधव यांना सांगितल्याचे  राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, मनसेने आंदोलने करुन ६५ ते ६७ टोल नाके बंद केली. 

शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१७ ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते. पण आम्हाला टोल नाक्याचे काय झाले? हे विचारले जाते.  मात्र टोलमुक्तीची घोषणा करणाºयांना कोणी प्रश्न विचारत नाही.मोपलवारांशी बोलणे झाले, २००२ ला अ‍ॅग्रीमेंट झाले. त्यावर पैसे उचलल्याचे ते म्हणाले. जो पेडर रोड  झाला नाही त्याचेही पैसे घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला? म्हैसकर हे कोणाचे लाडके आहेत. एकनाथ शिंदे यांनी टोल संदर्भात याचिका  का मागे घेतली? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. जे पिळवणूक करतात, लोकं त्यांनाच मतदान करतात, असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपोषण मागे घ्यायला लावलेयेत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचेही त्यांनी  स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच आता आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. मुख्यमंत्री ठाण्याचेच असल्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.  तसा झाला नाही तर पुढचे आंदोलन गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवडणूका येतायेत, मुख्यमंत्र्यांनाही पुन्हा उभे रहायचे आहे. त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी दोस्ती, लोढा, हिरानंदानी कॉम्पलेक्समधील रहिवाशांनीही टोल मुक्तीसाठी राज ठाकरे यांची भेट ष्घेतली. 

उपोषणाची सांगता..राज ठाकरे यांनी व्यासपीठावर जाऊन अविनाश जाधव यांना उपोषणाची सांगता करण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांच्यासह ओवळा माजीवडा उपशहर प्रमुख पुष्कर विचारे यांनीही या उपोषणाची सांगता केली. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवीद्र मोरे आणि बहुसंख्येने मनसैनिक उपस्ति होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAvinash Jadhavअविनाश जाधव