- प्रज्ञा म्हात्रेठाणे : मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा आहे. मी त्यांच्याइतका मोठा नाही, अशी ताकीद सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली असली, तरी मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आजचे हिंदुहृदयसम्राट हे राज ठाकरेच आहेत, असे आवर्जून सांगितले. जाधव यांनी शनिवारी ठाण्यात लावलेल्या बॅनरवर ‘साहेबांचे खरे वारसदार हिंदुहृदयसम्राट श्रीमान राजसाहेब ठाकरे’, असे लिहिले होते.शिवसैनिकांनी मनसेच्या या बॅनरबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच असल्याचे म्हटले आहे. परंतु, भविष्यात राज हे हिंदुहृदयसम्राट होऊ शकतात, अशी आशा मनसैनिकांनी व्यक्त केली आहे.जाधव यांनी शनिवारी पक्ष कार्यालयासमोर लावलेल्या बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. राज यांनी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मला हिंदुहृदयसम्राट संबोधू नका, अशी सूचना केली. राज यांच्या भूमिकेचे ठाण्यातील शिवसैनिकांनीही कौतुक केले. जाधव मात्र म्हणाले की, आजचे हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे हेच आहेत. मला हिंदुहृदयसम्राट संबोधू नका, असे राज म्हणाले नाही तर हिंदुहृदयसम्राट असे बॅनर लावू नका, अशी सूचना त्यांनी केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. परंतु, आजचे हिंदुहृदयसम्राट माझ्यासाठी राज हेच आहेत, असे जाधव म्हणाले.तो बॅनर काढलाशनिवारीच तो बॅनर काढल्याची माहिती मनसेच्या एका पदाधिकाºयाने दिली. त्या बॅनरला ट्रक घासला असल्याने तो खराब झाल्याचे कारण त्या पदाधिकाºयाने पुढे केले आहे.हिंदुहृदयसम्राट ही पदवी बाळासाहेबांना लोकांनी दिली. जसे ‘जाणता राजा’ म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यांसमोर येतात, तसे हिंदुहृदयसम्राट म्हटले की, बाळासाहेबच येतात. त्यांच्याशी कोणी तुलना करू नये. पदवी ही लोकांनी दिली पाहिजे.- विलास जोशी, सचिव,शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्षमाझ्यासाठी आजचे हिंदुहृदयसम्राट राज ठाकरेच आहेत. कारण, दहीहंडी उत्सव मंडळ, गणेशोत्सव मंडळाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत. भविष्यात ते एकमेव नेते आहेत, जे हिंदूंच्या हिताच्या मुद्द्यावर ताकदीने उभे राहतील.- अविनाश जाधव, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष
बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राजच हिंदुहृदयसम्राट - अविनाश जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:18 AM